नायगाव नगरपंचायतीवर काँग्रेसची एकहाती सत्ता; माजी आमदार वसंत चव्हाण यांनी विरोधकांना पाजले पाणी !

सर्वच 17 जागेवर काँग्रेसने मिळवला विजय

586

एस.एम.मुदखेडकर,

नायगाव, नांदेड –

नायगाव नगरपंचायतवर माजी आ.वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा काँग्रेसची एक हाती सत्ता आली असून सर्वच १७ जागावर विजय मिळवत विरोधकांना धूळ चारत पाणी पाजले आहे.भाजपच्या आ.राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली खाली लढलेल्या भाजपला एकाही जागेवर विजय मिळवता आला नसल्याने दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान सर्व विजयी उमेदवारांचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांनी भ्रमनध्वनीवरून अभिनंदन केले.

मतमोजणी तहसील कार्यालयात 

मतमोजणी प्रक्रिया 19 जानेवारी रोजी तहसील कार्यालयात पार पडली. यासाठी पाच टेबल लावण्यात आले होते.एका टेबल वर एक प्रभाग असे पहिल्या फेरीत पाच मतदान केंद्राची असे एकूण चार फेऱ्यात मतमोजणी करण्यात आली. 10.30 ते 11.20 पर्यंत सर्वच निकाल आहे. मतमोजणी केंद्रा बाहेर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. निवडणूक यंत्रणा व्यवस्थित पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी, तहसीलदार गजानन शिंदे, मुख्याधिकारी नंदकुमार भोसीकर, पेशकार राजेश आलमवाड, पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, पो.नि.अभिषेक शिंदे, महादेव पुरी, विजय जाधव, यांनी परिश्रम घेतले.

विजयी उमेदवारांची आभारसभा विजय चव्हाण यांच्या निवासस्थानी घेण्यात आली यावेळी काँग्रेसचे पक्ष निरिक्षक विजय येवनकर, मजूर फेडरेशनचे चेअरमन लक्ष्मीकांत गोणे, माजी उपमहापौर आनंद चव्हाण व जि.प.शिक्षण सभापती संजय बेळगे, सय्यद रहीम यांनी शुभेच्छा दिल्या.

नायगाव विधानसभा मतदार संघाचे भाजपा आ.राजेश पवार यांनी नगरपंचायतीच्या निवडणुकीत येथील स्थानिक भाजपा कार्यकर्त्याना विश्वासात न घेता इतर पक्षातील आयात उमेदवारांना उमेदवारी बहाल केल्यामुळे शहरातील भाजपात धुसफूस होती, त्याचा फायदा घेत काँग्रेसने नगर पंचायत निवडणूक प्रचंड बहुमताने जिंकून एकहाती सता मिळवली.

नायगाव नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी बुधवार दिनांक 19 रोजी पार पडली, यात विजयी उमेदवार यांची नावे अशी,
एकूण जागा-17

काँग्रेस पक्ष -17
भाजप -0
शिवसेना -0

वॉर्ड क्र-1
बोईनवाड आशाताई हणमंत (काँग्रेस)
वॉर्ड क्र-२
भालेराव शरद दिगंबर (काँग्रेस)
वॉर्ड क्र-३
तुमनबाई भीमराव सोनकांबळे (काँग्रेस बिनविरोध)
वॉर्ड क्र-४
शिंदे सुधाकर पुंडलीकराव (काँग्रेस)
वॉर्ड क्र-५
कल्याण शिवाजी शंकराराव (काँग्रेस)
वॉर्ड क्र-६
कल्याण मिनाबाई सुरेश (काँग्रेस )
वॉर्ड क्र-७
सय्यद सखरी हाजीसाब (काँग्रेस)
वॉर्ड क्र-८
विजय दत्तात्रय भालेराव (काँग्रेस बिनविरोध)
वॉर्ड क्र-९
गीता नारायण जाधव(काँग्रेस बिनविरोध)
वॉर्ड क्र-१०
भालेराव दयानंद इरबा(काँग्रेस)
वॉर्ड क्र-११
बेळगे विठ्ठल लक्ष्मण (काँग्रेस)
वॉर्ड क्र-१२
चव्हाण विजय शंकरराव (काँग्रेस)
वॉर्ड क्र-१३
चव्हाण अर्चना संजय (काँग्रेस)
वॉर्ड क्र-१४
मंदेवाड काशीबाई गंगाधर (काँग्रेस)
वॉर्ड क्र-१५
भालेराव ललिता रवींद्र (काँग्रेस)
वॉर्ड क्र-१६
चव्हाण पंकज हणमंतराव (काँग्रेस)
वॉर्ड क्र-१७
शेख मरियमबी नजीरसाहब (काँग्रेस)

Leave A Reply

Your email address will not be published.