नायगाव शहरात शाळकरी मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू.

3,793

नायगाव, नांदेड –

नायगाव शहरातील माणिक नगर येथील रहिवासी तथा जनता हायस्कुल नायगाव बा.चा इयता दहावीचा विद्यार्थी साईनाथ भीमा इंगळे (उपडहुद्दे ) हा मित्रा सोबत विहीरीत पोहण्यासाठी गेला असता पाण्यात बुडुन मृत्यू पावल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.सदर घटनेचे वृत्त शहरात कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

साईनाथ भीमराव इंगळे हा शाळा करून काही मित्रा सोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी नायगाव शहराच्या पश्चिम बाजूला लालवंडी रस्त्यावर असलेल्या धनंजय शंकरराव पाटील चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत पोहण्यास शिकण्यासाठी गेला होता.ट्यूब लावून पोहण्यास शिकणाऱ्या साईची ट्यूब निसटली व 80 फूट खोल पाण्याने भरलेल्या विहीरीत तो बुडाला. सोबतचे विद्यार्थी मित्र यांनी घाबरून जाग्यावरून पोबारा केला. बाजूलाच काही विद्यार्थी बसलेले होते ते तेथे धावून गेले त्यातील विद्यार्थ्यांनी आरडा ओरड केली.त्यामुळे कोणकेवाड हे चव्हाण परिवाराचे नोकर धावत आले त्यांनी व उपस्थित विद्यार्थी  सुमित कल्याण यांनी पाण्यात उडी टाकून बुडणाऱ्या साईला काढण्याचा प्रयत्न केला.पण कमरेचा करदोडा तुटल्याने तो निसटला व भरपूर खोल असलेल्या विहीरित बुडाला.

सदर घटना दुपारी दोनच्या दरम्यान घडली नोकरदार यांनी आपले मालक धनंजय चव्हाण यांना घटना कळवली त्यांनी आपले बंधू केशव पाटील चव्हाण व श्रीनिवास पा चव्हाण यांना घेऊन पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे याना कळवली.तात्काळ शिंदे साहेब यांनी पोलीस उप नि.बाचावार व पोलिस फौजफाटा घेऊन घटना स्थळ गाठले असता विद्यार्थ्यांचे दप्तर, खिचडी, जिलबी, पाण्याची घागर आदी वस्तू त्या ठिकाणी आढळून आल्या.

नायब तहसीलदार संजय देवराय, मंडळ अधिकारी दत्तात्रय धर्मापुरीकर हे देखील उपस्थित झाले.उद्धव संगेपवाड व दोन नोकरदार आणि ग्रामस्थ यांनी भरपूर प्रयत्न करून ही प्रेत निघत नव्हते हे पाहून देवराय यांनी तलाठी बी.एस.राठोड यांना पाठवून एन डी आर एफ ची टीम नांदेडहून बोलावली साडे पाच वाजता टीम आली. सायंकाळी साडेसहा वा. प्रेत बाहेर काढले.रात्री उशिरा ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे शवविच्छेदन करून रात्री नऊ वाजता शोकाकुल वातावरणात सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.