तामसा येथे नायब तहसिलदार,मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यावरील दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेऊन संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचा वतीने कामबंद आंदोलन करीत तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पोलीसांनी कोणतीही शहानिशा न करता नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यावरील दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे, खोटे गुन्हे दाखल करणा-या संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी संघ अर्धापूर तालुक्याच्या वतीने लेखणी बंद आंदोलन करत निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. यावेळी कोषाध्यक्ष रमेश गिरी, कार्याध्यक्ष मंडळ अधिकारी शेख शेफियोद्दीन, सचिव चंद्रकांत महाजन यांच्यासह तालुक्यातील अनेक तलाठी, मंडळ अधिकारी उपस्थित होते.