हदगाव, नांदेड –
हदगाव शहरातील संत रंगूमाई नगरमधील ज्येष्ठ नागरिक नारायण लामतुरे वय 85 वर्षे यांचे गुरूवारी रात्री 2 वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. स्वर्गीय नारायणराव लामतुरे यांच्या पार्थिव देहावर आज शुक्रवारी दुपारी 3 वाजता हदगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
नारायणराव लामतुरे यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली,सुना,नातुपणतू असा मोठा परिवार आहे. ते पोलीस नाईक बालाजीराव लामतुरे यांचे वडील होत.