निमगाव ते शिर्डी पायी दिंडीचे अर्धापूर येथे स्वागत.

511
सखाराम क्षीरसागर,
अर्धापूर, नांदेड –
अर्धापूर तालुक्यातील निमगाव ते शिर्डी पायी जाणाऱ्या भाविक भक्तांचे मोठ्या उत्साहात स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत. निमगाव येथील श्री साईबाबा यांच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविक भक्तांचा नाष्टा व चहापाणी करत पुुढील प्रवासाठी शुुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दत्ता पाटील पांगरीकर, जि.प.सदस्य बबनराव बारसे, गंगाधर पाटील चाभरेकर, शिवसेना तालुका प्रमुख संतोष कपाटे, युवासेनेचे भगवान पवार, मारोतराव पाटील दुधाटे, सरपंच प्रतिनिधी सतिश पाटील पांगरीकर, शहरप्रमुख सचिन येवले, ज्ञानेश्वर देबगुंडे, साहेबराव हाट्टेकर, भगवान पवार, गुणवंत विरकर, प्रकाश लोणे, कैलासराव दुधाटे,संदीप शिंदे,ओम नागलमे, बाळासाहेब किरकण, माधव किरकण, त्र्यंबकराव हाट्टेकर,संदिप गोपनपल्ले यांच्यासह अनेक जणांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.