निवघा (बा.)येथे 84 हजार रूपयाचा गुटखा जप्त, हदगाव पोलीसांची कारवाई.

हदगाव तालुक्यामध्ये गोळी भांडार दुकानाच्या नावाखाली सुगंधित तंबाखू व गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री.

425

                       पुरुषोत्तम बजाज

                         हदगाव, नांदेड.

हदगाव तालुक्यातील निवघा बाजार येथे राज्य शासनाने बंदी घातलेला गुटखा निवघा बाजार परीसरात सर्रास खुलेआम विक्री केल्या जातो तर येथील काही दुकानातून परीसरातील खेडयापाड्यात गुटख्याचा पुरवठा मोटरसायकल द्वारे केला जातो. याची कुणकुण हदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हुनुमंत गायकवाड यांना लागली यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान निवघा बाजार येथील प्रसिद्ध असलेल्या गजानन गोळी भांडार वर छापा मारून विविध कंपनीचा 84 हजार शंभर रूपयाचा गुटखा जप्त केल्याची माहीती पोलीस निरीक्षक यांचे मुन्सी पांचाळ यांनी भ्रमणध्वनी वरुन बोलतांना दिली.

निवघा बाजार येथील काही निवडक दुकानात गुटख्याचा साठा करुन परीसरातील खेडयापाडयात दुचाकीद्वारे पुरवठा केला जातो . बुधवार रोजी हदगावच्या पोलीस पथकाने तीन दुकानावर चौकशी केली असता एका दुकानावर गुटख्याचा माल आढळून आल्याने 84 हजार 100 रूपयाचा माल जप्त केला असून सदर गुटखा विक्रेता प्रकाश रामराव काकडे रा.निवघा बाजार यांच्या विरूद्ध पो.उ.नि . संजयकुमार गायकवाड यांच्या फिर्यादीवरून हदगाव ठाण्यात रात्री 9:00 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उ.नि.फोलाने, पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ हबंर्डे, पोलीस कॉन्स्टेबल चिंतले,पोलीस कॉन्स्टेबल जयंत पाईकराव,पो.कॉ.जेठण पांचाळ, पो.कॉ.लक्ष्मण गाडे यांनी ही धाडसी कारवाई केली.या कारवाईमुळे इतर गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.