नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची वन विभागाकडे मागणी; वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी वनविभागाने उपाय योजना करण्याची गरज.

वन विभगाचे दुर्लक्ष होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप.

391

जयकुमार अडकीने

माहूर, नांदेड –

यावर्षी आधीच सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्या पिकांना आता वन्यप्राण्यांपासून धोका निर्माण झाला आहे. परिसरातील हरडप शिवारात सुभाष देवराव गुघाने पाटील यांच्या हरडप शिवारातील गट क्र.३१ या शेतात जवळपास ३ एकर क्षेत्रावरील कापूसचे उभे पिक रानडुकराच्या कळपाने नासधुस करून नेस्तनाबूत केले आहे. सदर नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी शेतकरी सुभाष गुघाने पाटील यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी माहूर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

सुभाष पाटील यांच्यासह मदनापूर, हरडप, कोळी, करळगाव, सायफळ, गोकुळ, , बोंडगव्हाण, सावरखेड आदी शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकात जंगलातून भटकत आलेले रानडूकरांचे कळप शेतातील उभी पिके नासधूस करीत असल्याने आधीच सततच्या पावसातून व अतिवृष्टीतून वाचलेली पिके आता वन्यप्राण्याच्या तडाख्यात सापडून नाश होत असल्याने परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आले असून वनविभागाच्या वतीने विशेष यंत्रणा लावून शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राण्यापासून रक्षण करावे व वन्य प्राण्यापासून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत असून परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी असतांना सुद्धा वन्य प्राण्याचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे रक्षण करण्याबाबत वनविभाग कसलीही उपाययोजना करत नसल्याचा आरोप शेतकाऱ्यांतून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.