पंढरपूर येथील धनगर समाजाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची लेखी निवेदनाद्वारे मागणी.

591
पुरुषोत्तम बजाज

हदगाव, नांदेड –

महाराष्ट्रातील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाच्या पंढरपूर नगरीत वडीलांचे छत्र नसलेल्या अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असलेल्या धनगर कुटुंबातील पंधरा वर्षीय मुलीला वाहनातून नेऊन तिच्यावर सात दिवस अत्याचार करण्यात आला असल्याने हदगाव तालुका धनगर समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करीत अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला व त्याला पाठीशी घालण्या-या व्यक्तींवर कडक कारवाई करावी यासाठी हदगाव तालुका धनगर समाजाच्या वतीने दि.२७ रोजी बुधवारी हदगाव येथे तहसील कार्यालयात तहसीलदार जिवराज डापकर यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली.

यावेळी आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ.बि.के.निळे, राजमुद्रा धनगर समाज सेवा संघाचे तालुकाध्यक्ष ओंकार हंडेवार , श्रीनिवास हुलकाने नगरसेवक, दैनिक मराठवाडा केसरी तालुका प्रतिनिधी गजानन सुकापुरे, धनगर समाज युवा मल्हार सेनेचे तालुका अध्यक्ष प्रभाकर दहीभाते, प्रभाकर डुरके, गजानन पंजाबराव मस्के, ज्ञानेश्वर हाराळ पळसेकर,ओमप्रकाश लकडे,बंडु पाटे, हाराळे डोरलीकर देवकाबाई मुलगीर,जिजाबाई बावणे, राहुल हुलकाने, आकाश लकडे, अशोक हिंगाडे, यांच्यासह धनगर समाज बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.