परतीच्या पावसामुळे अर्धापूर तालुक्यातील सोयाबीनसह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

607

सखाराम क्षीरसागर

अर्धापूर, नांदेड –

गत काही दिवसापासून होत असलेला व आता परतीच्या पावसाने दि.९ शनिवारी रोजी दुपारी ३ वाजता परतीचा मुसळधार पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकात पाणीच पाणी साचले असून अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अर्धापूर तालुक्यात शनिवारी दुपारी ३ वाजता परतीच्या मुसळधार पावसामुळे शेत – शिवारातील पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी साचल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर करावा व शासनाने सोयाबीन,हळद,ऊस,केळी,कापूस,ज्वारी,पालेभाज्या पिके घेणा-या शेतकऱ्यांना शासनाने सरसकट मदत करावी अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे शेतकरी तुळशीराम बंडाळे,उपसरपंच विठ्ठल बंडाळे,कपील कोंढेकर यांनी केली आहे.

अर्धापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन, हळद,केळी,ऊस,ज्वारी व पालेभाज्या लागवड केलेली असून शनिवारी रोजी दुपारी ३ वाजता वादळी परतीच्या पावसामुळे अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर,दाभड, मालेगाव मंडळातील मालेगाव, सावरगाव, गणपुर, कामठा, कोंढा, देळूब, उमरी, शेनी आदी गावातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना पिक विमा मंजुर करावा तसेच महाराष्ट्र शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या झाडाला मोडे फुटत आहेत तर मोठ्या प्रमाणात सोयाबीन काळवंडलेले होत आहे सोयाबीनची गुणवत्ता घसरल्यामुळे निच्चांकी दर मिळत असल्यामुळे पुन्हा शेतकरी अडचणीत सापडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.