पाच हजाराच्या लाच प्रकरणी पोलीस जमादार व होमगार्ड चतुर्भुज.

1,383

नायगाव, नांदेड –

दारू विक्रेत्यांवर कार्यवाही न करण्यासाठी लाच मागल्या प्रकरणी जमादार व होमगार्ड चतुर्भुज झाल्याची घटना शकरंनगर रामतीर्थ पोलीस ठाण्यात आज 5 ऑक्टोबर रोजी घडली. या घटनेने पुन्हा एकदा अवैध धंद्याचा गोरखधंदा प्रकरण उजेडात आले आहे.

या बाबतचे सविस्तर प्रकरण असे की आटकळी भागाचे जमादार पाटील व होमगार्ड कपील भालेराव यांनी दारु विक्रेत्यावर कारवाई न करण्यासाठी पाच हजाराची लाच मागली होती आणि होमगार्डने तक्रारदाराकडून पाच हजाराची रक्कम बिलोली तालुक्यातील खतगाव फाटा येथे स्विकारतांना त्यास अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू होती.

या प्रकरणातील तक्रारदार यांनी दि.४ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देवून रामतीर्थ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस जमादार लक्ष्मण पाटील व होमगार्ड कपिल भालेराव तक्रादार यांना दारू विकीचा व्यवसाय करतांना कार्यवाही न करण्यसाठी हप्ता म्हणून ५ हजार लाचेची मागणी करीत आहेत असे नमूद केले.

तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाकडून दिनांक ०४ व ०५/१०/२०२१ रोजी पंचासमक्ष केले लाच मागणी पडताळणी मध्ये लोकसेवक पाटील व होमगार्ड भालेराव तक्रारदार यांचेकडे त्यांचे उपरोक्त कामासाठी ५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याबाबत निष्पन्न झाले.
त्यामुळे दि.०५ ऑक्टोबर रोजी खतगाव फाटा कमानी जवळ, ता. बिलोली परिसरात सापळा लावण्यात आलेल्या सापळ्या दरम्यान होमगार्ड कपिल भालेराव यांनी तक्राररदार कडून उपरोक्त कामासाठी ५ हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारली आहे. म्हणून पोलीस जमादार लक्ष्मण मारोती पाटील, वय ५५ वर्ष, व्यवसाय नोकरी पोहेकॉ/१९१९ पोलीस स्टेशन रामतिर्थना बिलोली रा. दत्तनगर, नायगाव जि. नांदेड व होमगार्ड कपिल लक्ष्मण भालेराव, वय २८ वर्ष, व्यवसाय शेती रा. अटकळी ता. बिलोली जि. नांदेड यांचे विरूध्द पोलीस ठाणे रामतिर्थ येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

सदरची सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक श्रीमती कल्पना बारवकर,पोलीस उप अधिक्षक धरमसिंग चव्हाण, राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्ता केंद्रे, अरविंद हिंगोले पोना किशन चिंतोरे, एकनाथ गंगातिर्थ, जगन्नाथ अनंतवार, सचिन गायकवाड यांनी पार पाडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.