पो.कॉ. इंगोले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

1,073

नांदेड –
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचारी राजरत्न मारोतीराव इंगोले (वय-३२ वर्ष) यांचे उपचारादरम्यान १ आक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर २ ऑक्टोबर रोजी नांदेडच्या सिडको परिसरातील ‘वैकुंठ धाम’ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले असून, पोलिस दलाच्या वतीने हवेत बंदुकीतून फैरी झाडून त्यांना शोक सलामी अर्थात अखेरची भावपूर्ण मानवंदना देण्यात आली आहे.

नांदेड ग्रामीण ठाण्यात एक वर्षापासून पो.कॉ.अर्थातच पोलीस कर्मचारी म्हणून कर्तव्य बजावणारे ‘राजरत्न’ इंगोले हे गेल्या दोन महिन्यापासून आजारी होते. दरम्यान, १ ऑक्टोबर रोजी पोलीस कर्मचारी राजरत्न इंगोले यांची उपचारादरम्यान मुंबई येथील एका प्रसिद्ध रूग्णालयात प्राणज्योत मालवली. राजरत्न इंगोले यांच्या पार्थिव देहावर २ ऑक्टोबर रोजी नवीन नांदेड भागातील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

याप्रसंगी उप विभागीय पोलीस अधिकारी सिध्देश्वर भोरे आणि पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या हस्ते पोलीस दलाच्या वतीने पोलीस कर्मचारी दिवंगत राजरत्न इंगोले यांचे पार्थिवावर नीरव शांततेत पुष्पचक्र अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. यावेळी नांदेड पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि बहुसंख्य पोलीस कर्मचाऱ्यांसह नांदेड ग्रामीण ठाण्यातील सपोनि. सुरेश थोरात, विश्वजित कासले, संकेत दिघे, पोउपनि. गणेश होळकर, आनंद बिचेवार, महेश कोरे व पोउपनि. विजय पाटील यांच्यासह सहकारी पोलीस      अधिकारी व कर्मचारी, मित्रमंडळी व नातेवाईकांचीही उपस्थिती होती. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, बहिणी व भाऊ असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.