प्रसिद्ध चित्रकार नयन बाराहाते यांचे निधन.

585

नांदेड –

साहित्य चळवळीतील सृजनशील व्यक्तिमत्त्व कवी, लेखक, सर्वोत्कृष्ट डिझायनर, मुखपृष्ठकार व येथील प्रसिद्ध चित्रकार आणि सृजन कम्युनिकेशन व पब्लीकेशनचे संचालक नयन बाराहाते यांचे आज बुधवार दि. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले आहे.मूळचे नागपूरचे असणारे नयन बाराहाते व्यवसायानिमित्त नांदेड येथे आले आणि तेथेच स्थायिक झाले.

त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी 11 वाजता राहते घर, तरोडेकर मार्केटच्या मागे, वजिराबाद, नांदेड येथून निघणार आहे. त्यांचे पार्थिव सध्या सृजन कम्युनिकेशन्स, खंडेलवाल प्लाजा, वजिराबाद येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात भाऊ, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.