प्रहार जनशक्ती पक्षाच्या देगलुर- बिलोली विधानसभा अध्यक्ष पदी माधव मेघमाळे तर बिलोली तालुका अध्यक्षपदी मनोहर देगलुरे यांची निवड.

277

ए. जी. कुरेशी

बिलोली, नांदेड –

राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष विठ्ठल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व युवक जिल्हाध्यक्ष यांच्या पुढाकाराने बिलोली येथील प्रहार सेवकांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.देगलुर- बिलोली विधानसभा अध्यक्षपदी माधव मेघमाळे, बिलोली तालुका अध्यक्ष पदी मनोहर देगलुरे, तालुका उपाध्यक्षपदी शंकर भाऊ आचेवाड, तालुका सरचिटणीस पदी नागनाथ आरोळे, यु.मो.तालुका अध्यक्ष पदी राहुल मामडे, यु.मो.तालुका उपाध्यक्षपदी मोनु चव्हाण, यु.मो.शहर अध्यक्ष पदी अविनाश शंखपाळे, वाहतूक आघाडी शहर अध्यक्ष पदी संतोष मुंडकर, यु.मो.तालुका सचिव पदी, विनोद हजगुळे, यु.मो.तालुका सरचिटणीस पदी गजानन कोपरे, सगरोळी सर्कल सचिव पदी हाणमंत पेंटलवार, आरळी सर्कल उपाध्यक्ष पदी तुकाराम उमरे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष पदी सचिन पन्नसवाड, सगरोळी सर्कल संपर्क प्रमुख पदी गुरुलिंग मठवाले आदी मान्यवर यांच्या नियुक्त्या करण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष विठ्ठल देशमुख, महानगर अध्यक्ष प्रितपाल सिंग, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष शंकर वडेवार, देगलुर तालुका अध्यक्ष कैलास येसगे कावळगावकर व अनेक प्रहारसेवक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.