प्राचार्य डॉ.राजेंद्र माळी यांना पितृशोक.

340
नांदेड –
आरोग्य खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी तथा अंगारा (ता. जि. सातारा) येथील ज्येष्ठ नागरिक प्रभाकरराव शिवाजीराव माळी (वय-८४ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने आज ८ डिसेंबर रोजी संध्याकाळी निधन झाले. दिवंगत प्रभाकरराव माळी यांच्या पार्थिव देहावर ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या मुळगावी अंगारा (ता.जि.सातारा) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. नांदेडच्या सिडको वसाहतीतील इंदिरा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र माळी यांचे ते वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.