प्रा.प्रवीण बिरादार यांनी केला आ.विक्रम काळे व पंचायत राज समितीचा सत्कार.
माहूर/नांदेड-
पंचायत राज समिती दि.०३ सप्टेंबर रोजी माहूर तालुक्याच्या दौऱ्यावर आली असता या समितीचे प्रमुख आ.विक्रम काळे यांचा महाराष्ट्र राज्य बि.एड.कृती समितीचे प्रदेश सरचिटणीस प्रा. प्रवीण बिरादार यांनी भव्य सत्कार केला. यावेळी आ.रत्नाकर गुटे, आ.देवराव होळी,आ.किशोर जोरगेवार यांचा पथकात समावेश होता. माहूर पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीनंतर शासकीय विश्रामगृहात माहूर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील अडीअडचणी व समस्याबाबत आ.विक्रम काळे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी प्राचार्य भगवानराव जोगदंड,गजानन गोडसे,विनोद गेडाम,लक्ष्मण जाधव,नितेश बनसोडे,ज्ञानेश्वर पवार,सिद्धेश्वर मोरे,प्रा.सुंकावार, प्रा.जाधव, प्रा.राठोड,अरविंद जाधव, सुधीर जामुतकर,रवि राठोड आदी उपस्थित होते. यावेळी माहूर तालुक्यातील विविध शैक्षणिक अडचणी सोडविण्यास विभागाचा शिक्षक आमदार म्हणून कटीबद्ध असल्याचे आ.काळे यांनी सांगितले.