प्रेयसी सोबत येण्यास तयार झाली तरी राग अनावर, प्रियकराने भर रस्त्यात केलं भयंकर कृत्य

795

नांदेड : नांदेड जिल्ह्यात महिला हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रागाच्या भरात प्रियकराने प्रेयसीची हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावाला राहण्यासाठी असलेल्या मुलांना भेटायला सोबत येत नसल्याने प्रियकराने प्रेयसीची हत्या केली. ही थरारक घटना किनवट तालुक्यातील वडोली शिवारात घडली आहे. माहूर तालुक्याच्या पालाईगुडा इथला मूळ रहिवासी पंकज जाधव याने तिथल्या बबिता मंगेश आडे या महिलेशी प्रेमसंबंध जुळविले. त्यानंतर तो सदर महिलेस घेऊन तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्याच्या नेरडगुंडा परिसरातील सुरदापूर इथं वास्तव्यास होता.

पंकज जाधव याची मुलं गावी पालाईगुडा इथेच राहात होती. त्या मुलांना भेटण्यासाठी चल, असा तगादा पंकज याने बबिता हिला लावत वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर अखेर दोघेही मंगळवारी सकाळी दुचाकीने सुरदापूर इथून पालाईगुडा इथं जाण्यासाठी निघाले.

Leave A Reply

Your email address will not be published.