फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पुजाऱ्याकडून विवाहितेवर बलात्कार.
नांदेड –
विवाहितेचा अंघोळ करतानाचा चोरून काढलेला फोटो समाज माध्यमामधून व्हायरल करण्याची धमकी देवून एका ४० वर्षीय विवाहितेवर अनेकदा बळजबरीने बलात्कार केल्याच्या आरोपावरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अखेर एका मंदिरातील आरोपी पुजाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील गोपाळचावडी येथील एका ४० वर्षीय विवाहितेसोबत याप्रकरणातील आरोपी तथा तुळजा भवानीनगर, गोपाळचावडी परिसरातील तुळजा भवानी देवीच्या मंदिरातील पुजारी श्रीपाद दिवाकरराव देशपांडे (रा. हडको, नांदेड) यांची ओळख झाली. दरम्यान, आरोपी श्रीपाद हा सन २०१५ मधील मार्च महिन्यात या प्रकरणातील फिर्यादी विवाहितेच्या घरी गेला. त्याचवेळी, आरोपी श्रीपाद देशपांडे याने विवाहिता या त्यांच्या घरी स्नान करतानाचा चोरून फोटो काढला आहे. याशिवाय, आरोपी श्रीपाद देशपांडे हा एवढ्यावरच थाबंला नसून, त्याने तो फोटो फिर्यादी विवाहितेलाच दाखवून तो ‘फोटो’ समाज माध्यमातून पसरविण्याची धमकी देवून विवाहिते सोबत बळजबरीने शरीर संबंध ठेवले. आरोपी श्रीपाद देशपांडे हा मार्च २०१५ पासून मी, ”तुझा व तुझ्या मुलांचा सांभाळ करतो”. मी तुझ्यासोबत लग्न करतो, मी महाराज आहे तसेच मला तुझ्यासाठी देवाने पाठवले आहे. मी, जे म्हणेल त्याप्रमाणे तु वागले पाहिजे, असे म्हणून त्याने फिर्यादी विवाहितेला दबावाखाली ठेवून नेहमीच जीवे मारण्याची धमकी दिली. याशिवाय, त्याने आपणास दबावाखाली ठेवून आपल्यासोबत वारंवार शरीरसंबंधही प्रस्थापित केले, असा आरोपही पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीमध्ये नमुद आहे,अशी माहीती पोलीस ठाणे अंमलदार प्रविण केंद्रे व मदतनीस पो.कॉ.जनार्धन महाले यांनी दिली.
याशिवाय, फिर्यादी महिला ही गत तीन वर्षापूर्वी त्याच्यापासुन तीन महिन्याची गरोदर राहिली असता, आरोपी श्रीपाद याने फिर्यादीच्या पोटात लाथ मारून पीडित विवाहितेचा गर्भपात केला. त्याचवेळी, गत तीन वर्षापासून फिर्यादीच्या २० वर्षीय मुलीकडे वाईट नजरेने पाहून मुलीच्या मोबाईलवर नेहमी अश्लील स्वरूपाचे मेसेज टाकून मुलीलाही सतत तु माझ्यासोबत बोल, असे म्हणून तिच्यासोबतही वाईट हेतूने जवळीक साधण्याचा प्रयत्न करून मुलीला त्रास दिला आहे, असा आरोपही पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीतच नमुद असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
याप्रकरणी सदर पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात अखेर १० ऑक्टोबर रोजी आरोपी श्रीपाद दिवाकर देशपांडे याच्या विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. विश्वजीत कासले व पो.कॉ. शंकर बिरमवार हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. एकंदरीतच या घटनेमुळे नांदेडच्या सिडको-हडको परिसरासह जिंदम नगर व अशोक नगर, गोपाळचावडी भागात एकच खळबळ माजली आहे.