फोन बंद ठेवून, जनतेच्या कामात का अडवणूक करतो म्हणून उपसभापतीकडून बिलोलीच्या ‘बीडीओ’ला मारहाण .
ए. जी. कुरेशी
बिलोली, नांदेड – बिलोली पंचायत समितीचे बी. डी.ओ.सतत फोन बंद ठेवून कार्यालयातुन गायब राहणाऱ्या व जनतेच्या कामात अडवणूक करतात म्हणून येथील गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांना उपसभापतीने सभापती निवासस्थानी बोलावून लाथा-बुक्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार १० नोव्हेंबर रोजी दुपारी २-१० वाजण्याच्या सुमारास घडला आहे. बीडीओच्या तक्रारीवरुन बिलोली पोलीसांत रात्री १० वाजेच्या दरम्यान उपसभापतीविरुध्द कार्यालयीन कामात अडथळा केला व अन्य भा. द.वि.चे कलम २२५, १२१, ३५३, ३४२ २९४, व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पंचायत समिती गटविकास अधिकारी व पंचायत समिती सदस्यांमध्ये कुरबुरी सुरुच होती. येथील बीडीओ गत दोन महीन्यापासुन कर्तव्यावर राहत नाही, ग्रामीण भागाचे अनेक कामे प्रलंबित आहेत. कर्मचाऱ्यांवर बी.डी.ओ.चे नियंत्रण राहीलेले नाही. त्यातच बी.डी.ओ.च्या मनमानीला कंटाळले. मागे पंचायत समिती सदस्यांनी मासिक सभेवर बहिष्कार टाकुन मासिक सभा रद्द करण्याची नामुष्की बीडीओवर आणली होती.यासह पं.स.सदस्यांना विश्वासात न घेणे, सुचविलेल्या कामांना जाणीवपूर्वक बगल देणे, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण न ठेवणे या बाबींमुळे सदस्यांमध्ये नाराजीचा सुर होता.तोच कित्ता गिरवीत २७ ऑक्टोबर रोजी रुजू झालेले बीडिओ ऑफिसला दाखल झाले नसून दिवाळीच्या कामकाजावेळी जाणिवपुर्वक फोन बंद ठेवल्यावरुन उपसभापती शंकर यंकम यांनी बीडीओ प्रकाश नाईक यांना सभापती निवासस्थानी बोलावुन अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन डांबुन मारहाण केली. यात बीडीओ यांचा शर्ट फाटला होता.मारहाणीची चर्चा सर्वत्र सुरु होताच बीडीओ नाईक यांनी नांदेड गाठले.परंतु द्विधा मनस्थितीत असलेल्या बीडीओंनी सदर प्रकाराबाबत दिलेल्या तक्रारीवरुन बिलोली पोलीसांत आरोपी उपसभापती शंकर यंकम यांच्या विरुध्द उशीरा रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे हे करीत आहेत.
२७ ऑक्टोबर रोजी रुजू होऊन ही पंचाईत समिती कार्यालयात अनुपस्थित राहण्याचे कारण विचारलो असता ‘तुला काय अधिकार आहे, म्हणतं मलाच ढकलुन देत, तुला दाखवितो’ म्हणतं शर्ट फाडून घेतले.मी अजिबात मारहाण, शिवीगाळ वैगेरे काहीच केलो नाही.
– शंकर यंकम,
उपसभापती पं.स.बिलोली.