बरबडा ते बरबडावाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ग्रामस्थांचे नायगाव तहसील येथे उपोषण.
नायगाव, नांदेड –
बरबडा ते बरबडावाडी या रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम चालू करून बरबडावाडीच्या नागरिकांची होत असलेली गैरसोय दूर करावी या मागणी साठी १६ सप्टें रोजी तहसिल कार्यालय नायगांव येथे बरबडा वाडी ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. गेल्या अनेक दिवसापासून बरबडावाडीच्या ग्रामस्थांना रस्ता नसल्याने त्रासाला सामोरे जावे लागत आहे.येथील नागरिक अनेक समस्यांना तोंड देत जीवन जगत आहेत अशा परिस्थितीत शासन म्हणावे तसे लक्ष देत नसल्याने येथील युवा ग्रामस्थ यांनी लोकशाही मार्गाने हा प्रश्न मिटावा व ग्रामस्थांची अडचण दूर व्हावी म्हणून उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे. यामध्ये माधव बालाजी शिंदे, रा.मु. बरबडावाडी यांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा दिलेले निवेदन व शासनाची उदासीनता यामुळे ग्रामस्थांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वदिनी उपोषण चालू केले आहे.
I
उपोषणात माधव बालाजी शिंदे सह संतोष गोविंदराव सर्जे,अमोल नसिंगा शिंदे, शिवाजी लक्ष्मण हासेवाड, माधव गुणाजी माचनवाड,अक्षय आनंदराव हासेवाड, जगदीश लकडोजी हासेवाड, बंडु रामकिशन हासेवाड, शिवाजी यशवंत हासेवाड,कोंडिबा गंगाराम हासेवाड, लक्ष्मणराव विठ्ठलराव सजै, देवराव सुरेवाड,नागोराव पुरस्वाड, गणेश बालाजी हासेवाड, त्रिपती बालाजी सर्जे, श्रींरग शिंदे,गजानन हसेवाड, शंकर उत्तमराव शिंद, राजेश गणपती दुबे,भास्कर हासेवाड,अवगेश हासेवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
तहसीलदार नायगाव यांनी या प्रकरणात लक्ष घालून जि.प.अंतर्गत येणाऱ्या या रस्त्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्वरित प्रश्न मिटवण्याचे कळविले असल्याने उपोषण माघार घेण्याचे कळविल्याचे तसे पत्र दिले आहे. तरी उपोषणकर्त्यांनी सायंकाळ पर्यंत उपोषण चालूच ठेवले होते.