बिलोलीच्या सगरोळी येथील विरभद्रा बाल गणेश मंडळाच्या वतीने लसीकरणास उत्सर्फूत प्रतिसाद.
ए.जी.कुरेशी
बिलोली, नांदेड –
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन याचे औचित्य साधून बिलोली तालुक्यातील मौजे सगरोळी येथे 17 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा प्रशासनाने विविध संस्थाच्या माध्यमातून लसीकरणासाठी व्यापक मोहिम हाती घेतली असून सार्वजनिक गणेश मंडळानाही यात पुढाकाराचे आवाहन केले होते. यात सगरोळी येथील विरभद्रा बाल गणेश मंडळ, महाजन गल्ली सगरोळी येथे ही शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यात प्राथमिक आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमातून जिल्हा भरात 75 हजार लसीकरणाचा हा संकल्प पूर्ण करु असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळाना यापूर्वीच समन्वय साधून ठिकठिकाणी लसीकरण शिबिराचे ही आयोजन केले गेले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी सातमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सगरोळी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून विरभद्रा बाल गणेश मंडळ महाजन गल्ली येथे लसीकरण, महाप्रसाद, स्वच्छता मोहिम राबवत शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण 217 लोकांनी आपली सहभाग नोंदवून नागरीकानी लस घेतले आहे. यावेळी लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी श्रीमती तायडे के.आर, केंद्रे एस.पी, दुगाने सिस्टर, बोडके लक्ष्मी, वाहन चालक श्रीनिवास दमय्यावार यात अध्यक्ष – महेश मडके तर उपाध्याक्ष – गणेश इबितवार, व्यंकट इबितवार, विश्वब्रम्ह प्रणित, राजू मुंडकर, आदीनाथ तेली आदी सदस्य पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.