बिलोलीत साठेनगर येथे अतिवृष्टीच्या पावसामुळे कौलारु घरांची भिंत पडली; तलाठी मोताळे यांनी भेट देऊन केला पंचनामा.
ए.जी.कुरेशी
बिलोली, नांदेड –
काल दि. 28 सप्टेंबर मंगळवार रोजी मुसळधार पावसामुळे शहरातील साठेनगर येथील कौलारु घराच्या भिंतीसह पुर्ण घर अतिवृष्टीच्या पावसामुळे पडले आहे.घराचे अन्नधान्य सामानाचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या दोन घराची येथील तलाठी मोताळे यांनी पाहणी करुन पंचनामा केला आहे. नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानधारक नबाजी जेठे व पोचीराम जेठे यांनी तहसिलदार बिलोली यांना निवेदन देऊन केली आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत तुडमे, सय्यद रियाज, बाबू कुडके, मार्तंड जेठे, हणमंत जेठे आदीनी घर पडलेल्या ठिकाणी भेट दिली. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते. घर कोसळल्याने या दोन जेठे कुटुंबियांना नगरपालिका मुख्याधिकारी इरलोड यांनी तात्पुरत्या स्वरुपात राहण्याची व्यवस्था केली आहे.