बिलोली नगरपालिका वाचनालयात क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी.
ए. जी. कुरेशी
बिलोली, नांदेड – बिलोली नगरपालिका संचलीत सार्वजनिक वाचनालयात क्रांती सुर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.मैथिली संतोष कुलकर्णी होते.
आपल्या क्रांतिकारी विचाराने आदिवासी समाजाला दिशा देणारे ब्रिटीशांच्या जुलमी राजवटी विरुध्द आदिवासी समाजाला संघटीत करुन क्रांतीची मशाल पेटवणारे स्वातंत्र्य संग्रामात देशासाठी बलीदान देणारे एका आदेशावर शेकडो लोक जमवुन इंग्रजांना गुडघे टेकायला भाग पाडणारे शहीद वीर क्रांतीकारक जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस नगराध्यक्षा सौ.कुलकर्णी यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
यावेळी उपनगराध्यक्ष मारोती पटाईत, नगरसेवक गटनेता नागनाथ तुम्मोड, नगरसेवक जावेद कुरेशी, मिर्जा शाहेद बेग, अमजद चाऊस, सौ, राधाबाई कुलकर्णी, अभियंता पवार , स्वच्छता निरीक्षक जाधव, सहाय्यक ग्रंथपाल गणेश फालके आदी उपस्थित होते.