बिलोली बस आगारातील सर्व कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरूच.

310

ए. जी. कुरेशी

बिलोली, नांदेड –

गत १८ दिवसांपासून बिलोलीत महाराष्ट्र एस.टी.कामगारांचे आंदोलन सुरूच असल्यामुळे रयत क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष पाडुरंग शिंदे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.

एस.टी.कामगारांच्या न्याय मागण्यासाठी आघाडी सरकार टाळाटाळ करीत आहे. दिवाळी मोठा सण असून कामगारांचे कुटुबिंय दिवाळी साजरी करु शकले नाही. कामगाराची २०१६ पासुन एकमेव मागणी आहे. देशातील अनेक राज्यातील महामंडळ राज्य सरकार मध्ये विलीन झालेले आहेत.आघाडी सरकार वर टीका करीत शिंदे म्हणाले की लखीमपुर मध्ये शेतकऱ्यांची हत्या झाली तेंव्हा महाराष्ट्र बंद केले. आजपर्यंत राज्यात ३६ कामगारांचा मृत्यु झाला. त्यांच्या कुटुंबियाचे दिवाळी सणात हाल पाहू शकत नाही. रयत क्रांती संघटना आपल्या पाठीशी आहे. १० नोव्हेबरला मुंबईत आंदोलन होईल.एस.टी.कामगारांना चलो मुंबईचे आवाहन पांडुरंग शिंदे यांनी केले,

Leave A Reply

Your email address will not be published.