बिलोली येथे सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा संपन्न.

351

ए.जी.कुरेशी 

बिलोली, नांदेड –

आंतर भारतीय शिक्षण संस्थेअंतर्गतच्या अर्जापुर येथील जयराम अंबेकर विद्यालयाचे मुख्याद्यापक चंद्रशेखर संतुकराव पाटील सावळीकर हे प्रदिर्घ सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार समारंभ आनंद गार्डन येथे आयोजित करण्यात आले. कार्यगौरव करुन त्यांना निरोप देण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आंतर भारती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार गंगाधराव पटने, माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे डॉ.गोविंद नांदेडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नागनाथ पाटील सावळीकर, शिक्षण विस्तार अधिकारी शिरीष आळंदे, गटशिक्षण अधिकारी दिंगबर तोटरे, प्रमोद देशमुख, नागनाथ पाटील सगरोळीकर, मोतीभाऊ केन्द्रे, अशोक मोरे सिपरकर,  प्रा. हैबतापुरे शिवलिंग ,सौ.नंदाबाई पटने, ऍड कुंचेलीकर, विठ्ठल चंदनकर, जयमाला पटने आदि सह मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.