भरदिवसा दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील गंठण पळविले

देगलूर शहरातील घटना

674
देगलूर, नांदेड –
देवदर्शन घेऊन घरी परत येत असतांना एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील गंठण दुचाकी-स्वारांनी पळवून नेल्याची घटना भर दिवसा शहरातील गजबजलेल्या रामपूर रोडवर घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील रामपूर रोड भागातील रहिवासी शांताबाई सुर्यकांतराव पडलवार (वय 65 ) या सोमवारी सकाळी शहरातील हनुमाननगर येथील देवाचे दर्शन घेऊन घरी परत येत असताना ब्रम्हकुमारी सेंटर जवळ काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोघांनी येवून त्यांच्या गळ्यातील 18 ग्रॅम वजनाचे (54 हजार रुपये किमतीचे) मिनीगंठण हिसकावून पळून गेले. तत्पूर्वी या दुचाकीस्वारांनी दोन वेळा त्यांच्या मागे पुढे फिरून त्यांचा अंदाज घेतला. महिलेच्या फिर्यादीवरून देगलूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या महिलेचा मुलगा परजिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे.
शहरात भुरट्या चोऱ्यांचे व मोटारसायकल चोरीच्या घटनेत वाढ होत आहे त्यामुळे नागरिकात भयभीत असतानाच अत्यंत गजबजलेल्या रस्त्यावर भर्दिवसा ही घटना घडल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.