भारतीय बौद्ध महासभाच्या हदगाव तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते नांदेड जिल्हा कार्यकारी यांच्या उपस्थितीमध्ये रुपेश गिरबिडे यांची निवड करण्यात आली असून पुढील वाटचालीस सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा नांदेड ( उत्तर ) यांच्या वतीने तालुका भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने हदगावची नवनिर्वाचित कार्यकारिणी गठित करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. हदगाव तालुक्यामध्ये धम्मकार्य अधिक गतिमान करण्यासाठी दि. २६ जानेवारी रोजी पंचशील बुद्ध विहार हदगाव येथे शाखा कार्यकारिणीची निवड झाली असून यावेळी बी.एल. कांबळे, सोनबा गिरबिडे, नांदेड जिल्हा संरक्षण विभागाचे सुरेश गजभारे यांच्यासह बौद्ध उपासक-उपासिका, श्रामनेर, बौद्धाचार्य ,समता सैनिक दलाचे पदाधिकारी, ग्राम शाखा अध्यक्ष, महिला ग्राम शाखा अध्यक्ष, हदगाव शहर शाखा पदाधिकारी उपस्थित होते.