भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या मंडळावर डॉ.लोंढे यांची निवड.

665
नांदेड –

दिल्ली येथील भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र शाखा, मुंबईच्या कार्यकारी मंडळावर विष्णूपुरी, नांदेड येथील ‘एसजीजीएस’ अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र संस्थेतील प्रा.डॉ.प्रदिप लोंढे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

भारतीय लोकप्रशासन संस्था, दिल्ली, महाराष्ट्र विभागीय शाखा, मुंबई कार्यकारी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा १५ नोव्हेंबर रोजी मंत्रालय, मुंबई येथे विभागीय अध्यक्ष स्वाधीन क्षत्रीय यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत भारतीय लोकप्रशासन संस्था, नवी दिल्ली, महाराष्ट्र शाखा-मंत्रालय मुंबईच्या कार्यकारी मंडळावर नांदेड येथील श्री गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र संस्थेतील प्रा.डॉ.प्रदिप लोंढे यांची २०२१-२०२३ या कालावधीसाठी सदस्य म्हणून पुन्हा बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वी डॉ. प्रदिप लोंढे हे २०१९ ते २०२१ या कालावधीतसुद्धा सदस्य म्हणून कार्यरत होते. प्रा. डॉ.प्रदिप लोंढे पाटील हे विष्णूपुरी, नांदेड येथील श्री गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेत प्रशिक्षण आणि आस्थापना अधिकारी म्हणून अनेक वर्षापासून कार्यरत आहेत.

‘यूपीएससी’मधून उतीर्ण झालेल्या तसेच देशभरातील आय.ए.एस. आय.पी.एस, आय.एफ.ओ.एस तथा मंत्रालयातील सचिव यासारख्या नागरी सेवा बजावणाऱ्या वर्ग-१ च्या अधिकाऱ्यांना भारतीय लोक प्रशासन संस्था, नवी दिल्ली या केंद्र शासनाच्या संस्थेचे माध्यमातून प्रशिक्षण दिल्या जाते. दरम्यान, प्रा.डॉ.प्रदिप लोंढे यांच्या उपरोक्त निवडीबद्दल ‘आय.आय.पी.ए’चे विभागीय अध्यक्ष स्वाधीन क्षत्रीय, सचिव विजय सतबीरसिंग व त्यांचे सर्व सहकारी सदस्यांसह ‘एसजीजीएस’ अभियांत्रिकी तसेच तंत्रशास्त्र संस्थेचे संचालक प्रा.डॉ.यशवंत जोशी यांच्यासह त्यांचे सहकारी अधिष्ठाता, प्राध्यापक, सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांतर्फे प्रा. डॉ. प्रदिप लोंढे यांचे स्वागत करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.