प्रा.विजय दामोधर यांना परभणी कृषी विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान.
लोहा, नांदेड –
नांदेड येथील प्रा.विजय दामोधर यांनी उद्यानविद्या शाखेतील फळशास्त्र विषयात परभणी कृषी विद्यापीठात प्रबंध सादर केला. विद्यापीठाने प्रबंधास मान्यता देवून दीक्षांत समारंभात प्रा. दामोधर यांना पीएचडी पदवी प्रदान केली.
डॉ.बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत आंबा संशोधन उपकेंद्र रामेश्वर, देवगड जि.रत्नागिरी येथे प्रभारी अधिकारी पदावर कार्यरत प्रा. विजय पुंडलिक दामोधर यांनी उद्यानविद्या शाखेतील फळशास्त्र विषयात विविध अन्नद्रव्ये व संजीवकाद्वारे केळीचे उत्पन्न वाढविणे, त्याच्या काढणी पश्चात्य तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे या विषयावर कै.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील उद्यानविद्या विभाग प्रमुख जी.वाय.वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध सादर केला. सदरील विद्यापीठाने प्रा.विजय दामोधर यांच्या प्रबंधास कै.नाईक कृषी विद्यापीठाने मान्यता देवून पीएचडी मंजूर केली.नुकतेच कृषी विद्यापीठाने प्रा.दामोधर यांना दीक्षांत समारंभात पीएचडी पदवी प्रदान केली. त्यांच्या निवडीबद्दल पी. जी.दामोधर, सागर लोमटे, डॉ.आर.व्ही.भालेराव, बेकटे, श्रीमती.धुतराज, डॉ.अजय दामोधर, धम्मदीप रोडे, प्रदीपकुमार कांबळे, धम्मराज मस्के आदींनी सत्कार केला.