भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या बूस्टर डोसच्या परिक्षणास DCGI ची मंजुरी

311
नवी दिल्ली-
नाकावाटे दिल्या जाणाऱ्या बूस्टर डोसच्या परिक्षणाला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) आज शुक्रवारी परवानगी दिली. हैदराबाद येथील भारत बायोटेककडून ही लस विकसित केली जात आहे. नऊ ठिकाणी इंट्रानझल बूस्टर डोसचे परिक्षण केले जाणार आहे. नुकतेच डीसीजीआयने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या नियमित बाजारातील विक्रीला परवानगी दिली होती.
तिसऱ्या डोसच्या तिसऱ्या टप्प्यातील परिक्षणाला मंजुरी मिळालेली भारत बायोटेक ही देशातील दुसरी कंपनी आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन स्ट्रेनचा मुकाबला करण्यासाठी बूस्टर डोस प्रभावी ठरणार असल्याचे भारत बायोटेककडून सांगण्यात आले आहे. (DCGI) बूस्टर डोस म्हणून कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड तसेच स्फुटनिक व्ही या लसींना आतापर्यंत परवानगी देण्यात आलेली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.