भोकर फाटा येथे कारच्या धडकेत एक जण जागीच ठार.

कार चालक व प्रवाशांनी जखमीला मदत करण्याऐवजी सामान घेऊन ठोकली धुम.

2,660

सखाराम क्षीरसागर

अर्धापूर, नांदेड –

भरधाव किया सोनेट कारने धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना दि.२३ गुरूवारी रोजी सकाळी ९ वाजता घडली. या अपघातातील कार चालका विरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड – भोकर रस्त्यावर दाभड (भोकर फाटा) पासुन १०० मीटर अंतरावर साईबाबा मंदिरासमोर अपघात झाला. भोकर ते नांदेड मार्गे भरधाव येणारी किया सोनेट कार ( एम.एच २२ ए.एम.८६४४ ) च्या चालकाचा ताबा सुटल्याने भोकर फाट्याकडे पायी येत असलेल्या पादचा-याला चिरडून रस्त्याच्या बाजूला खड्डयात कार पलटी झाली.
यामध्ये मोहम्मद रमजान मोहम्मद सरीफ, वय ३१ (भोकर फाटा येथील पंम्चर दुकानदार) राहणार केलाजलालपुर पोस्ट सलेमपुर डुमरिया, जिल्हा वैशाली बिहार यांना कारने जोरदार धडक दिली. जबर मार लागल्याने मोहम्मद रमजान जागीच ठार झाला.

हा अपघात घडताच कार चालक व प्रवाशांनी जखमींला मदत करण्याऐवजी गाडीतील सामान घेऊन धूम ठोकली. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महामार्ग पोलीस केंद्र अर्धापूर वसमत फाटा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अरूण केंद्रे, पोउनी ज्ञानेश्वर बसवंते, पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी भेट देऊन फौजदार के.के.मांगुळकर,जमादार शेख मजाज, श्रीराम कदम,मदतनीस वसंत सिनगारे,ईकबाल शेख, प्रभाकर कर्डेवाड,राजकुमार व्यव्हारे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी हजर होऊन रस्त्यावरील गर्दी बाजूला करुन त्या जखमींला शासकीय रुग्णालय अर्धापूर येथे महामार्ग पोलीस यांच्या रुग्णवाहिकेत दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सदर अपघाता प्रकरणी माहिती महामार्ग पोलीसांनी दिली आहे. या अपघात प्रकरणी अली असदर अब्दुल गफाक यांच्या फिर्यादी वरून अज्ञात कार चालका विरुद्ध कलम २७९,३०४(अ) भादवि प्रमाणे एम.एच.२२-ए.एम.८६४४ किया फोरव्हीलर कारचा चालक याच्या विरूद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कपील अगलावे हे करीत आहेत.या घडलेल्या भीषण अपघातामध्ये मयत झालेले मोहम्मद रमजान यांच्या पश्चात आई, वडिल, भाऊ, पत्नी मुलगा असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.