मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने केला शंखनाद आंदोलन करून आघाडी शासनाचा निषेध.
नांदेड-
भाजपाच्या अध्यात्मिक आघाडी तर्फे महाराष्ट्रातील मंदिरे सुरू करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रविण साले व भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली पंचवटी हनुमान मंदिर येथे दोन तास शंखनाद आंदोलन व भजन करून आघाडी शासनाचा निषेध करण्यात आला.
महाराष्ट्रात सर्वत्र कोविडचे कारण देत महाविकास आघाडी सरकारने मागील 2 वर्षापासून सर्व मंदिरे बंद केली असून दारुचे दुकान, बियर बार, व्यापार, व्यावसायिक कारखानदार सर्व व्यवहार चालू झाले आहेत. त्यामुळे मंदिराची दारे उघडी करावी यासाठी प्रचंड घोषणाबाजी करून हनुमान पेठ परिसर दणाणून सोडला. यावेळी भाजपा महानगर नांदेड अध्यात्मिक आघाडीचे संयोजक पंढरीनाथ मुरकुटे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग भजन मंडळ व्यंकटेशनगर येथील महिलांनी भजने सादर केली.
भजनी मंडळाचा सदस्यासह महिला भगिनी सोबत कीर्तन करुन आंदोलन केले. यावेळी बोलताना प्रवीण साले म्हणाले, एकीकडे सरकार सर्व देवस्थानाचे उत्पन्न वापरते कोल्हापुर,शिर्डी,पंढरपुर, सिद्धिविनायक मंदिर या सारख्या संस्थाच्या वतीने अनेक सेवा प्रकल्प राबविले जातात.
मंदिराशी संलग्न फूलवाले, पुजारी,अन्नछत्रात काम करणारे, वाहन चालक, पुजेचे साहित्य विकणारे यांची उपासमार होत आहे. दूसरीकड़े राजकीय पक्षाचे मेळावे मोर्चे,आंदोलन सुरू असून हज़ारों लोक एकत्रित येत आहेत.प्रणीता देवरे चिखलीकर यांनी आघाडी सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा आपल्या भाषणातून निषेध व्यक्त केला. यावेळी अध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक राजेश महाराज देगलूरकर यांचे समयोचित भाषण झाले. प्रास्ताविक व संचलन जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी केले.
आंदोलनात अरविंद भारतीया,मिलिंद देशमुख,विजय गंभीरे,व्यंकट मोकले,अनिल हजारी, सुशील चव्हाण,मनोज जाधव, मारोती वाघ, विपुल मोकळे, संतोष परळीकर, डॉ.श्रावण पाटील भिलंवड़े, डॉ.सचिन उमरेकर,व्यंकटेश जिंदम,आशीष नेरलकर, नवल पोकर्णा,संतोष क्षिरसागर, दिलीपसिंग सोढ़ी, केदार नांदेड़कर,सुनील पाटील,चक्रधर कोकाटे, श्रीराज चक्रवार, जनार्धन वाकोडीकर,प्रशांत पळसकर,अनिल लालवानी, रोहित पाटील, आनंद पावड़े, रमेश गटलेवार,संदीप छप्परवाल, अंबादास जोशी,महादेवी मठपती, अपर्णा चितळे,कामाजी सरोदे, संतोष ओंढेकर,आदित्य जोशी, राज यादव यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.