मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त कोविड महालसीकरण मोहीम अंतर्गत माहुरात आठ ठिकाणी कॅम्प.!
जयकुमार अडकीने
माहूर, नांदेड –
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या निर्देशानुसार दि.१७ सप्टेंबर रोजी माहूर शहरात विविध आठ ठिकाणी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत कोविड महालसीकरण अंतर्गत लसीकरण कॅम्प लावण्यात येणार असून सर्व नागरिकांनी या महालसीकरणाचा लाभ घेऊन कोरोनापासून सुरक्षित व्हावे असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.व्ही.एन.भोसले, नगरपंचायतचे मुख्याधिकारी राकेश गिड्डे यांनी केले आहे.
शहरातील नगरपंचायत कार्यालय येथे वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ.एस.बी.चौधरी यांच्या समवेत आरोग्य सेविका श्रीमती पि.आर. कचकलवार, मदतनिस पि.डी.शेंडे, नवी आबादी शाळा येथे श्रीमती डॉ.कुलसुम फातेमा यांच्या समवेत आरोग्यसेविका श्रीमती पि.बी.खरे, मदतनीस के.बी.चिरडे, ग्रामीण रुग्णालय माहूर येथे डी.एम.ओ यांचे समवेत आरोग्यसेविका श्रीमती नम्रता राठोड, वक्रतुंड गणेश मंडळ माहूर येथे डॉ. एस.ओ.मुनगिलवार समवेत आर.बी.एस.के.पथक क्र.१, साईश्रद्धा गणेश मंडळ माहूर डॉ.अभिजित अंबेकर समवेत आर.बी.एस.के.पथक क्र.२, जय भवानी गणेश मंडळ माहूर येथे डॉ.वसीम सय्यद यांचे समवेत आरोग्य सेविका के.बी.नोमुलवार, मदतनीस जि.जि.काळे, आनंद दत्तधाम आश्रम उर्फ वसमतकर मठ येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.निरंजन केशवे यांच्या समवेत आरोग्य सेविका एस.सी.बोथिंगे , मदतनीस एच. के.कुमरे, बसस्थानक माहूर येथे डॉ.अभिजित अंबेकर समवेत आरोग्य सेविका आर.के.साबळे मदतनीस भोपाळे हे कर्तव्य बजावणार असून या महालसीकरण मोहिमेचे नियंत्रण अधिकारी वैद्यकीय अधिकारी डॉ.किरणकुमार वाघमारे हे आहेत.
सदर मोहिमे अंतर्गत कोविड लसचा पहिला व दुसरा डोस अद्याप न घेतलेल्या जास्तीत नागरिकांचे लसीकरण करण्याकरिता नगरपंचायत माहूर ग्रामीण रुग्णालय माहूर, वक्रतुंड गणेश मंडळ माहूर, साईश्रद्धा गणेश मंडळ माहूर, जयभवानी गणेश मंडळ माहूर, आनंद दत्तधाम आश्रम माहूर सह शहरातील जागरूक नागरिक, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव माहूर शहर कोरोना पासून सुरक्षित करण्याचा संकल्प ठेऊन जास्तीत जास्त नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करीत समुपदेशन करीत परिश्रम घेत आहेत.