महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेची नवीन कार्यकारिणी. जिल्हा कार्यकारिणीवर प्रभाकर पत्तेवार यांची निवड.

524

पुरुषोत्तम बजाज

हदगाव, नांदेड –
महाराष्ट्र आर्य वैश्य सभेच्या जिल्हा कार्यकारिणीवर नवीन सदस्य निवडण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्य सचिव गोविंद बिडवई व कोषाध्यक्ष सुभाष कन्नावार यांच्या प्रमुख उपस्थितीत हदगाव येथे आर्य समाज सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा कार्यकारिणीवर सदस्य म्हणून हदगावचे प्रसिद्ध व्यापारी प्रभाकरराव पत्तेवार आणि डॉ. संजय पलीकोंडावार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

समाजाबद्दलची आपुलकी योग्य, अयोग्य याची खातरजमा करीत केवळ सामाजिक जाणिवेतून आपल्या व्यस्त आणि अमूल्य वेळ काढून नंदूभाऊ गादेवार आणि सर्व कार्यक्षम सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक समाजबांधवांच्या वैयक्तीक भेटीगाठी आणि सुखदुःखाची विचारणा करण्यासाठी, महासभेच्या विस्ताराच्या कार्यात समाजबांधवांचा सहभाग आणि संकल्पना वृद्धिंगत करण्यासाठी त्यात आवश्यक ते बदल करून सर्वसमावेशकता आणण्यासाठीच मुख्य समन्वयक गोविंदराव बिडवई, सुभाषराव कन्नावार, अनिल मनाठकर, प्रदिप कोकडवार, नंदकुमार मडगूलवार, सदानंद मेडेवार, विजय कुंचनवार, राजेश्वर रायेवार, नरेंद्र येरावार
यांच्या प्रमुख उपस्थितीत हे सदस्य निवडीचे सोपस्कार पुर्ण करण्यात आले.

यावेळी भेटगाठीचा आणि कार्यकारिणी निवडीचा होत असलेला दौरा प्रचंड उत्साहात पार पडला, त्यास ऊत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक तसेच कोरोना सारख्या महामारीच्या काळात रुग्णांना डबे पुरविण्यात केलेल्या संवेदनशील कार्यात सुद्धा, शुद्ध भावनेने संपूर्ण महाराष्ट्रातील समाजबांधवांचे योगदान लाभण्यासाठी प्रत्येकाला समाजाची सेवा करण्याची संधी मिळावी या उद्देशाने या निवडी दर तीन वर्षांनी करण्यात येत असतात. जिल्हा कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल प्रभाकरराव पत्तेवार आणि डॉ. संजय पलीकोंडावार यांची हदगाव तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार याचवेळी सभेत उपस्थित असलेले हदगाव येथील उद्योजक श्रीनिवास दमकोंडवार, डॉ. गोकुळ चक्करवार, प्रमोद मामीडवार, बंडोपंत रायेवार, राजेश्वर रायेवार, विलास व्यवहारे, केरबाराव रुद्रकंठवार, मनोज कल्चरवार, सुरेश तुप्तेवार, अनिल प्रतापवार, डॉ. अरुण मुक्कावार, राजेश दमकोंडवार, डॉ. संतोष मामीडवार, प्रीतम पत्तेवार, धनंजय चिद्रावार, उदय गंधेवार, वसंत पत्तेवार, डॉ. कवटीकवार, किरण व्यवहारे, अशोक पिंगळीकर यांच्यासह अनेक समाज बांधवांनी सत्कार केला. तसेच शहरातील व तालुक्यातील सर्व मित्र, नातेवाईक व आर्य वैश्य समाजाच्यावतीने निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.

यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित झालेले सुभाष कन्नावार यांचा हदगाव तालुक्याच्यावतीने आर्य वैश्य समाजाचे तालुका सचिव सुनील व्यवहारे यांनी यथोचित सत्कार केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार राम वट्टमवार यांनी मानले तर कार्यक्रमाची प्रस्तावना शिरीष मनाठकर यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.