महाराष्ट्र – तेलंगणा सीमावर्ती बंद वाहतूक चालू करा अन्यथा आंदोलन.

365

ए.जी.कुरेशी
बिलोली, नांदेड –

महाराष्ट्र -तेलंगणा सीमावर्ती मांजरा नदीवरील येसगी येथील निजामकालीन जुना व नविन पुल हा पुल नुकताच ६ व ७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमध्ये जुन्या पुलावरुन पाणी गेल्याने खड्डे पडुन काही ठिकाणी तडे गेले तर या पूर्वीच नविन पुलाला क्रॅश आल्याने यावरुन होणारी अवजड वाहनाची वाहतूक गेल्या वर्षापासुन बंद करण्यात आली व अवजड वाहनासाठी पर्यायी व्यवस्थेसाठी जुन्या पुलाची थातुर मातुर डागडुजी करुन वाहतूक सुरळीत चालू करण्यात आली होती. पण लाखो रुपये यावर खर्च केलेली ही थातुर- मातुर डागडुजी देखील अतिवृष्टीच्या प्रवाहात वाहुन गेल्याने हा पर्यायी मार्ग देखील वाहतुकीसाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वे बंद करण्यात आला. तर दोन्ही पुलावरील वाहतूक बंद असल्यामुळे महाराष्ट्र – तेलंगणातील प्रवाशांना ये-जा करण्यासाठी तसेच या सीमावर्ती भागातील १५ ते २० गावातील शेतकरी,व्यापारी व मजुरवर्गासह अनेकांच्या विविध रोजगाराचा व व्यवसायिकांच्या पोटापाण्याच्या उपजिवीकेसाठी व निजामाबाद हैद्राबाद येथे रुग्णाना उपचारार्थ जाण्यासाठी हा महत्वपुर्ण मार्ग बंद झाल्याने नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

हा मार्ग येत्या आठ ते दहा दिवसापर्यंत पर्यायी व्यवस्था करुन सर्व वाहनाची वाहतूक सुरळीतपणे चालू करुन प्रवाशाची होणारी गैरसोय टाळावी अन्यथा बिलोली शहर विकास कृती समिती व नागरीकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येइल, असा इशा-याचे निवेदन बिलोली तहसिलदार यांना आज दि.२४ सप्टेंबर रोजी देण्यात आले.सदर निवेदनावर सुभाष पवार, विजय कुंचनवार, गोविंद मुंडकर,भिमराव जेठे, राजु पा.शिंपाळकर, संजय पोवाडे, गणेश हांडे, गणेश पा.कुरे, मौलाना आहेमद बेग,इनामदार हनिप आदीच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.