महाराष्ट्र तेली महासंघाच्या प्रदेश कार्यकारिणीची उद्या नांदेडात आढावा बैठक.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर विजय चौधरी, सौ.संध्याताई सव्वालाखे यांची प्रमुख उपस्थिती.

457

सखाराम क्षीरसागर

अर्धापूर, नांदेड –

प्रदेश तेली महासंघाची नांदेड विभागातील आढावा बैठक दि.२८ मंगळवारी रोजी दु.१२.वा.हाॅटेल विसावा पॅलेस शिवाजी नगर नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस तेली महासंघाच्या पदाधिका-यांनी उपस्थितीत राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील तेली महासंघाची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीस अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर, तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, कार्याध्यक्ष माजी खा.सुरेश वाघमारे,विक्रांत चांडवडकर, तेली महासंघाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा सौ.संध्याताई सव्वालाखे, उद्योजक मनोहर सिनगारे, माजी आ.शिवाजीराव चौथे, प्रदेश महासचिव ज्ञानेश्वर दुर्गुंडे,
अँड.अभिषेक भगत, संजय सिनगारे आदी मान्यवर उपस्थितीत राहून मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत नांदेड जिल्ह्यातील तेली महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत रहावे असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष अँड.बालाजीराव बनसोडे, अशोकराव बिजवे, दिपकराव सोनटक्के, इं.गजेंद्र साखरे, प्रकाश व्यंकटपूरवार, नागनाथ चिटकूलवार, पत्रकार सखाराम क्षीरसागर, ईश्वर पिन्नलवार, गिरीश बेंद्रे, कृष्णा तिम्मापूरे, भास्कर डोईबळे, मधुकर क्षीरसागर, बबनराव बनसोडे, गणेश उकरंडे,नंदकिशोर झोळगे, प्रकाश काळे, भगवान सोळंके, जिजाबाई तगडपल्ले, सौ.सिमा मुळावकर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.