महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माहूर शहराध्यक्ष पदी गणेश वर्मा यांची निवड.

152

जयकुमार अडकीने

माहूर, नांदेड –

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नांदेड (ग्रामीण)जिल्हाध्यक्ष रवी राठोड व जिल्हा उपाध्यक्ष डॉ.असिफ यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा व पद निवड प्रक्रिया कार्यक्रम स्थानिक कपिलेश्वर धर्मशाळा येथील सभागृहात संपन्न झाला. यावेळी गणेश गंगुसिंग वर्मा यांची शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली, त्यांना नियुक्तीचे पत्र रवी राठोड यांनी दिले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माहूर मनसेचे तालुकाध्यक्ष विनोद पाटील सूर्यवंशी तर प्रमुख उपस्थितीत नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवी राठोड, डॉ. असिफ हे होते.

यावेळी तालुक्यातील निरंजन राठोड, समाधान बेहेरे, मयूर गोरगट्टे, अक्षय राठोड सुरेश शिंदे, यांच्यासह अनेक युवकांनी पक्ष प्रवेश केला.यावेळी राम दातीर, वैभव जाधव,सुनील ताडेवाड, गणेश वर्मा, निशांत पुरी, सागर काण्णाव, अक्षय परसवाळे, आकाश ताडेवाड, सचिन शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.