मागण्या मान्य झाल्या नाहीतर सरकारचं भविष्य आम्हाला ठरवावं लागेल – Vinayak mete

965

बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी सरकारला थेट अल्टिमेटम दिलं आहे. मराठा समाजावरील अन्याय सरकारने दूर करावा. अन्यथा आम्हाला सरकारचं भविष्य ठरवावं लागेल, असा इशारा विनायक मेटे यांच्याकडून देण्यात आला आहे.

बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी विनायक मेटे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाजाचं जीवन अंधकारमय झालं आहे. यामुळे मराठा आरक्षण मिळालं नाहीतर सरकारचं भविष्य आम्हाला ठरवावं लागेल, असा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे.

मराठा समाजावर अन्याय होत आहे. त्यामुळे तातडीने मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य करा, नाहीतर आंदोलनाची पुढची दिशा काय असणार हे आम्हाला माहिती नाही असं विनायक मेटे यांनी म्हटलं आहे. इतकंच नाहीतर अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेली केली.

Leave A Reply

Your email address will not be published.