माजी आ.साबणे यांना भाजप प्रवेशापूर्वीच उमेदवारी; नरसीत श्रावण पाटील भिलवंडे यांच्या निवासस्थानी बंद दाराआड साबणेंची फडणवीस व दरेकर यांच्यासोबत पार पडली गुप्त बैठक.
नायगाव, नांदेड –
बिलोली देगलूर मतदारसंघाची पोटनिवडणुक लागली अन एकच चर्चा सुरू झाली ती म्हणजे शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांच्या नावाची..निवडणूक आयोगाने तारीख घोषित करताच निवडणूकीचे चक्र जोरदार फिरू लागली अन शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत अनेकांनी शिक्कामोर्तब केले. माजी आ. साबणे हे भाजप प्रवेश करून देगलूर-बिलोली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची चर्चा असतानाच प्रवेशा पूर्वीच उमेदवारी जाहीर झाल्याने चर्चेला पुर्णविराम बसला आहे.
पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा व श्रावण पाटील भिलवंडे यांच्या वतीने नरसीत सकाळी न्याहरीची मेजवानी..
नायगाव तालुक्यात पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर,खा.प्रताप पाटील चिखलीकर आदीनी कहाळा येथे भेट व कुंटुर येथे नदी काठावर गोदावरी नदीच्या बॅकवाटरने शेतीचे प्रचंड झालेल्या नुकसानीची पाहणी केली.यानंतर बिलोली तालुक्यातील दौऱ्यावर जाताना नरसी येथे भाजपचे जिल्हा सरचीटणीस श्रावण पाटील भिलवंडे यांच्या निवासस्थानी सकाळचा नाश्ता न्याहरी केली.यावेळी त्यांचे भिलवंडे परिवाराच्या वतीने सपत्नीक सहकुटुंब स्वागत करण्यात आले.
नरसीत श्रावण पाटील भिलवंडे यांच्या निवासस्थानी बंद दाराआड साबणेंची फडणवीस व दरेकर यांच्यासोबत गुप्त बैठक..
यावेळी देगलूर-बिलोलीचे माजी आ.साबणे यांच्या सोबत
नरसीत श्रावण पाटील भिलवंडे यांच्या निवासस्थानी बंद
दाराआड देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकरांसोबत गुप्त बैठक झाली.यावेळी खा. प्रताप पाटील चिखलीकर हजर होते.देवेंद्र फडणवीस बाहेर येताच विविध चॅनलच्या व वृत्तपत्राच्या पत्रकारांनी बंद दाराआड काय घडले? असे विचारताच फडणवीसांनी बगल देत ते माझे जुने सहकारी मित्र आहेत, मी दौऱ्यावर आल्याने ते भेटण्यासाठी आले देगलूरच्या उमेदवारीबद्दल थांबा आणि वाट पाहा असे सांगत निघून गेले..
माजी आ.साबणे सेना सोडताना झाले भावूक..
माजी आ.सुभाष साबणे यांना पत्रकारांनी घेरले असता त्यांनी शिवसेना सोडताना दुःख होतंय पण पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या एकाधिकारशाहीमुळे आपली महाविकास आघाडीत घुसमट होत असल्याने भाजपमद्धे जात असल्याचे सांगितले व शिवसेना नेतृत्वावर कोणतीच टीका न करता भावूक होऊन आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
दरम्यान देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीसाठी मुखेड येथील गणाचार्य मठसंस्थानचे मठाधिपती डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांचेही नाव चर्चेत असून विश्व हिंदू परिषद बजरंग दल व काही भाजपच्या पदाधिकारी यांच्याकडून महाराजांचे नाव अग्रस्थानी असल्याची माहिती आहे.तर काँग्रेस कडून जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
भाजपची ज्येष्ठ मंडळी नांदेड दौ-यावर असून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना देगलूर-बिलोली मतदार संघात राजकीय फायदा नफ्याचीही पाहणी करणार आहेत त्यामुळे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या किल्याला सुरुंग लावायचा असेल तर तयारीही तशीच असायला हवी हे सुद्धा भाजप नेत्यांना अगोदरच कळले असेल म्हणूनच हा खटाटोप आहे. या दौऱ्यात आ.राम पाटील रातोळीकर,आ राजेश पवार, राजेश कुंटुरकर, डॉ.अजित गोपछडे, बालाजी बचेवार,प्रवीण साले,चैतन्य बापू देशमुख,लक्ष्मण ठकरवाड,माधव अणा साठे,बाळू खोमणे, यासह नायगाव, बिलोली, देगलूर तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.