माधवराव पांडागळे यांना नवीन नांदेडात श्रध्दांजली.

506

नांदेड –

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, कंधार पंचायत समितीचे माजी सभापती तथा माजी जि.प. सदस्य माधवराव पांडागळे यांना आज १८ सप्टेंबर रोजी सकाळी नांदेडच्या सिडको-हडको परिसरातील काँग्रेसचे आजी-माजी नगरसेवक, वाघाळा ब्लॉक काँग्रेसचे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नांदेडच्या सिडको-हडको परिसरात वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद कांचनगिरे तसेच नगरसेवक श्रीनिवास जाधव यांच्या वतीने दिवंगत माधवराव पांडागळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अभिवादन सभा घेण्यात आली आहे.

प्रारंभी, वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद कांचनगिरे यांच्या संपर्क कार्यालयात काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी सभापती दिवंगत माधवराव पांडागळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दरम्यान, नगरसेवक श्रीनिवास जाधव यांच्या हडकोतील संपर्क कार्यालयातही जेष्ठ नेते दिवंगत माधवराव पांडागळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. सिडको आणि हडको परिसरात आयोजित अभिवादन सभेदरम्यान, मान्यवरांनी कै. माधवराव पांडागळे यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकले. त्याचवेळी, नांदेड- वाघाळा शहर मनपाचे माजी सभापती किशोर स्वामी, माजी नगरसेवक संजय इंगेवाड, प्रल्हाद गव्हाणे, माजी नगरसेविका डॉ. करूणा जमदाडे, प्रसेनजित वाघमारे तसेच के. एल ढाकणीकर आदींनी आपापल्या मनोगताद्वारे दिवंगत नेते माधवराव पांडागळे यांच्या जीवन- कार्यावर प्रकाश टाकला.

याप्रसंगी प्रवक्ते संतोष पांडागळे, माजी सभापती किशोर स्वामी, नगरसेवक श्रीनिवास जाधव, राजु काळे, उदय देशमुख, डॉ.करूणा जमदाडे, उदय देशमुख, संजय इंगेवाड, नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव बापूसाहेब पाटील, सतिश बसवदे, प्रसेनजित वाघमारे, प्रतिक जमदाडे, वामनराव देवसरकर, वैजनाथ माने, शंकरराव धिरडीकर, के. एल. ढाकणीकर, प्रल्हाद गव्हाणे, शेख हुसेन, दलितमित्र माधवराव आंबटवार, नारायण कोंलबीकर, बाबुराव आवनुरे, शेख हुसेन, संजय कदम, शेख मोईन लाठकर, अँड. संदिप मनाठकर, शेख लतीफ, शाहीर बाबुराव जमदाडे, गिरीधर मैड, शेख गुलाब रसुल चुडीवाले, एस. पी. कुंभारे तसेच पंजाबराव देशमुख यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी तसेच बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.