माहूरला भगतसिग जयंती साजरी.

कठोर मेहनत व जिद्द यशस्वीचा पाया-कॉ.विनोद गोविंदवार.

435

जयकुमार अडकीने
माहूर, नांदेड –

आज १० ऑक्टोबर २०२१ रोजी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया माहूर तालुका कमिटीच्या वतीने कांबळे सर आणि वाघमारे सरांच्या शिखवणी वर्गा वर शहीद भगत सिंग यांच्या ११४ व्या जयंती निमित्त कॉम्रेड विनोद गोविंदवार मुखेड यांचं भगतसिंग आणि SFI या विषयावर व्याख्यान झाले.

कार्यक्रमाची सुरुवात भगत सिंग यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सुरू झाली.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन SFI चे नांदेड जिल्हा सहसचिव प्रफुल्ल कउडकर यांनी केले. विचारमंचावर उपस्थित मान्यवर SFI चे राज्य कमिटी सदस्य स्टॅलिन आडे,कांबळे सर आणि कॉम्रेड विनोद गोविंदवार उपस्थित होते.

कॉम्रेड विनोद गोविंदवार यांनी भगतसिंग यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत त्यांचे क्रांती कार्य आणि त्यांचे विचार संक्षिप्त रूपात विद्यार्थ्यांसमोर मांडत असताना जीवनामध्ये यशस्वी होण्याकरिता जिद्द मेहनत व त्याग महत्वाचे आहे. तेव्हाच यशाची शिखरे गाठता येतात . आज आपण जे शिक्षण घेतो यासाठी अनेक समाज सेवक व क्रांतिकारकांनी उभे आयुष्य घातले आहे तेव्हा तुम्हा आम्हा बहुजनांना शिक्षणाची दार उघडले आहे ती पण सध्याचे भांडवली सरकार खाजगीकरण करून महागडी करीत आहे तेव्हा शिक्षण घेत असताना भगतसिंगाचे विचार डोळ्यासमोर पढाई और लढाई दोन्ही सोबतच करावी लागेल अन्याय व हक्कासाठी लढाई तर जीवनात यशस्वी होण्यासाठी लढाई गरजेची आहे असे बोलताना म्हणाले.

यावेळी क्लासेसचे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. तसेच तुषार कांबळे, सिद्धार्थ मुळे तालुका अध्यक्ष विशाल नरवाडे उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आकाश कांबळे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.