माहूरात पाच वर्षापासून रखडलेला तालुका स्तरीय गुरुगौरव पुरस्कार यंदा तरी देण्याची मागणी.!

सभापती, गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे विविध मागण्याचे निवेदन.

196

जयकुमार अडकीने

माहूर,नांदेड-

शिक्षकांच्या दरमहा वेतनास होत असलेल्या विलंबासह विविध मागण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका माहूर तर्फे प.स.सभापती अनिता कदम,गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे व तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांना दि.६ सप्टेंबर रोजी निवेदन सादर केले. शिक्षकांचे दरमहा वेतन विलंब न करता तात्काळ करा,गेली पाच वर्षापासून प्रलंबित असलेले तालुकास्तरावरील गुरुगौरव पुरस्कार देण्यात यावे, सर्व पात्र शिक्षकांचे एकस्तर वेतनश्रेणी आदेश देण्यात यावे,अर्जित रजा प्रसूती रजा व इतर सर्व प्रकारचे देयके त्वरित अदा करावे., कोरोना नसलेल्या भागात नियमीत प्रत्यक्ष वर्ग चालू करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणे, शैक्षणिक अडीअडचणी चर्चा करण्यासाठी सर्व शिक्षक संघटना यांची दर द्विमाही बैठक आयोजित करणे, कोरोना काळात कर्तव्य बजावलेल्या शिक्षकांना प्रशस्तीपत्र देणे, मुख्याध्यापक शा.पो.आ.मानधन त्वरित द्या आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. सदर मागण्या तात्काळ सोडवण्यात येईल असे आश्वासन गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांनी दिले आहे. त्याबरोबरच सर्व शिक्षकांची डुप्लिकेट सेवापुस्तिका अद्ययावत करण्यासंदर्भात कॅम्पचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.

तसेच लवकरच सर्व संघटना पदाधिकारी,गटशिक्षणाधिकारी तसेच आस्थापना लेखा व आस्थापना शिक्षणविभाग या सर्वांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आदेश दिले. यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र चारोडे, सचिव चैतन्य उबाळे,जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर जगताप, कोषाध्यक्ष परमेश्वर कुसुमवाड, सहसचिव शशिकांत जिचकार, उपाध्यक्ष संतोष शिरगुरवार, संघटक राजू विशवकर्मा,सारंग साळुंके केंद्रे, संजय हरणे, संजय वाठोरे याबरोबरच शिक्षक संघाचे अनेक सदस्य शिक्षक उपस्थित होते.

तहसीलदार वरणगावकर यांनी ग्रामपंचायत निवडणूक मानधन संदर्भात तात्काळ लक्ष घालत सध्या स्थितीचा आढावा घेतला. शिष्टमंडळासमक्ष कर्तव्य बजावलेल्या सर्व शिक्षक बांधवांची खाते क्र. नावाची यादी मागवली आणि सर्व त्रुटींचा निपटारा करून, शाखा व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक माहूर यांना फोन करून तात्काळ हे मानधन सर्व शिक्षकांच्या खाती वर्ग करण्याची सुचना केल्याने निवडणूक मानधन लवकरच शिक्षकांना मिळणार असल्याची अपेक्षा शिक्षक मंडळीनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.