माहूर तालुक्यातील आष्टा ग्रामपंचायतने घेतला पुढाकार, शंभरी पार..!

321

जयकुमार अडकीने

माहूर, नांदेड –

सध्या सर्वत्र कोरोना या आजाराने धुमाकूळ घातला आहे. उठता, बसता सगळीकडे या आजाराचा वेगाने वाढणारा संसर्ग आणि लॉकडाऊन मुळे विस्कळीत झालेले जनजीवन यावरच चर्चा सुरु असते. कोरोनापासून बचाव करण्यासाठी आष्टा ग्रामपंचायत सरसावले आहे.शासनाच्या आदेशाचे पालन करून लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी माहूर तालुक्यातील आष्टा ग्रामपंचायतने प्रभात फेरी काढत कोरोना जनजागृती अभियान हाती घेतले. कोरोना पासून लोकांना सावध राहण्याचे आवाहन एक छोटा प्रयत्न चांगलाच प्रभावी ठरला आहे.

17 सप्टेंबर रोजी कोविड-19 महालसीकरण कार्यक्रम ग्रामपंचायत मध्ये आयोजित करण्यात आले, यामध्ये तब्बल 115 लोकांनी कोरोना लस घेतली. या महालसीकरण कार्यक्रमाचे आयोजन मंडळ अधिकारी सुगावे,तलाठी कुडमेते मॅडम,ग्रामसेवक व्ही. एस. जाधव,डॉ. प्रकाश जाधव, सरपंच प्रमोद पेंन्दोर,उपसरपंच विजय खरे, खांडेकर सर, ग्रा.प.सदस्य जितेश जाधव, दसरथ कचारे यांनी आयोजित केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.