माहूर नगरपंचायतमध्ये शिवसेना किंगमेकर ! राष्ट्रवादी काँग्रेस ७, काँग्रेस ६, शिवसेना,३, भाजप १
दोन माजी नगराध्यक्ष, एक उपनगराध्यक्ष पराभूत, दोन माजी नगराध्यक्ष विजयी, माजी उपनगराध्यक्ष पराभूत
जयकुमार अडकीने,
माहूर, नांदेड –
माहूर सन २०११ मध्ये पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकाराने ग्रा.पं.चे न.पं. मध्ये रुपांतर झाल्यानंतर सन २०११ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी ८, काँग्रेस ४, शिवसेना ४, अपक्ष १ असे पक्षीय बलाबल होते. त्यावेळी प्रथम नगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे समर त्रिपाठी हे विराजमान झाले होते. परंतु अवघ्या १४ महिन्यानंतर काँग्रेस पक्षाने अविश्वास ठराव आणून त्यांना पायउतार करून काँग्रेसचे राजेंद्र केशवे यांना नगराध्यक्ष पदी विराजमान करून न.प. ताब्यात घेतली.
सन २०१६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ८, शिवसेना ४, काँग्रेस ३, भाजप १ व एमआयएम १ असे पक्षीय बलाबल होते. राष्ट्रवादी काँग्रेसने एमआयएमशी हातमिळवणी करून फिरोज दोसानी यांना नगराध्यक्ष पदावर विराजमान करून न.प. ताब्यात घेतली. सन २०२१-२२ मध्ये झालेल्या न.प. निवडणुकीत मतदारांनी नेहमीप्रमाणे संमिश्र कौल देत राष्ट्रवादी ७ काँग्रेस ६, शिवसेना ३, भाजप १ अशा जागा निवडून दिल्या. यामुळे माहूर शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले असून स्थानिक राजकारण पाहता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही अशी मतदारात चर्चा असून वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. सता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाला शिवसेनेशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे सध्या माहूर न.प. मध्ये शिवसेना किंगमेकर ठरणार आहे. सदर निवडणुकीत प्राचार्य राजेंद्र केशवे, समर त्रिपाठी, फिरोज दोसानी, कु.शीतल जाधव तर उपनगराध्यक्ष राजकुमार भोपी असे एकूण चार माजी नगराध्यक्ष व एक माजी उपनगराध्यक्ष निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी प्राचार्य राजेंद्र केशवे, फिरोज दोसानी यांनी विजयी मिळविला असून समर त्रिपाठी कु.शीतल जाधव राजकुमार भोपी पराभूत झाले आहेत.
माहूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीतील विजयी उमेदवार-
वार्ड क्र- 1
भंडारे विलास बालाजी (काँग्रेस)
वार्ड क्र- 2
आशाताई निलधारी (शिवसेना)
वार्ड क्र- 3
कांबळे नंदा रमेश (काँग्रेस)
वार्ड क्र- 4
कामटकर विजय शामराव (शिवसेना)
वार्ड क्र-5
सारीका देविदास सिडाम( राष्ट्रवादी )
वार्ड क्र- 6
सौदागर मसरत फातेमा अब्दुल (राष्ट्रवादी)
वार्ड क्र- 7
केशवे राजेंद्र नामदेव (काँग्रेस)
वार्ड क्र- 8
सौंदलकर कविता राजू (काँग्रेस)
वार्ड क्र- 9
सय्यद शकीलाबी शबीर (राष्ट्रवादी)
वार्ड क्र- 10
शेख लतीफा मस्तान (काँग्रेस)
वार्ड क्र-11
लाड ज्ञानेश्वर नारायण (शिवसेना)
वार्ड क्र-12
राठोड सागर विक्रम (काँग्रेस)
वार्ड क्र- 13
महामुने सागर सुधीर (भाजप)
वार्ड क्र-14
शेख बिलकीस अहमद अली (राष्ट्रवादी)
वार्ड क्र- 15
दोसानी फिरोज कादर (राष्ट्रवादी)
वार्ड क्र- 16
खडसे अशोक कचरू( राष्ट्रवादी)
वार्ड क्र- 17
पाटील शिला रणधीर (राष्ट्रवादी)