माहूर न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन. जनतेने लोकन्यायालयात सहभाग घेऊन तडजोडीने प्रकरणे निकाली काढावी. – न्यायाधीश पवनकुमार तापडीया.

446

जयकुमार अडकीने
माहूर, नांदेड –

दिवाणी व फौजदारी न्यायालय क.स्तर माहूरच्या वतीने दि.२५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त गरजू पक्षकारांनी लोकन्यायालयात सहभाग घेऊन आपली प्रकरणे निकाली काढावी असे आवाहन विधी सेवा प्राधिकरण माहूरचे अध्यक्ष तथा दिवाणी व फौजदारी न्यायालय क.स्तर माहूरचे न्यायाधीश न्या. पवनकुमार तापडिया यांनी केले आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्याआदेशानुसार शनिवार दि. २५/ ०९/२०२१ रोजी पवनकुमार तापडीया न्यायाधीश माहूर यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली तडजोड पत्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी, कौटुंबिक वादासंबंधीची, कौटुंबिक हिंसाचाराची, चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम १३८ खालील प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणांत बँक, वीज, बिल वसुलीची प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. तसेच केसेस ही ठेवली जाणार आहेत.

१ ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या लोकन्यायालयात १०४ प्रकरणी निकाली काढण्यात आली असून तडजोडी अंती १ कोटी २० लक्ष रु. चे दावे संपुष्टात आले आहेत. दि.२५ रोजी आयोजित लोकन्यायालयात ३ हजार ५०० प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आले असून त्या अनुषंगाने पक्षकारांना नोटीस पाठविण्यात आल्या असून नोटीस आल्याने घाबरून न जाता पक्षकारांनी आपल्या वकीलांशी संपर्क साधून लोकन्यायालयात आपली प्रकरणे तडजोडीसाठी २५ रोजी सकाळी ११ वा. माहूर न्यायालय येथे हजर राहावे असे आवाहन न्या. पवनकुमार तापडीया यांनी संबधित पक्षकारांना केले आहे.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर सर्व वकील, पक्षकार, कर्मचारी यांनी योग्य ती खबरदारी घेवून उपस्थित रहावे. पक्षकारांनी राष्ट्रीय लोक अदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून प्रकरणे तडजोडीने मिटविणे बाबतच्या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन सहायक सरकारी अभिवक्ता डी.एस.भारती, वकील संघाचे अध्यक्ष ॲड.एस. एस.कांबळे, यांचे सह ॲड.सी. एम. राठोड, ॲड.अविनाश ढगे,अँड. श्याम गावंडे, अँड.जगदीश अडकीने, अँड. दिनेश येऊतकर, अँड.विशाल भवरे, अँड. दिलीप मेहता, अँड.छंदक वाठोरे,अँड.विशाल चव्हाण, ॲड. एस.पी कांबळे, ॲड एस. एस. राठोड, ॲड यु.व्ही.भोपी, ॲड. रवी कोंडे, अँड. पवन ठेपेकर,अँड.नितेश बनसोडे, अँड.कु. सायली कपाटे आदींनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.