माहूर भाजपला शिवसेनेचा जब्बर धक्का; एकमेव भाजपा नगरसेविका दिपाली लाडचे पती ज्ञानेश्वर लाड यांनी हाती बांधले शिवबंधन..

माहूर न.प.च्या राजकीय समीकरणात होणार मोठे उलटफेर.!

622

जयकुमार अडकीने

माहूर, नांदेड –

माहूर भाजपाला शिवसेनेनेने जबर धक्का दिला असून माहूर न.प. अस्तित्वात येण्यापूर्वी पासूनच माहूर ग्रा.प.च्या सभागृहात गेल्या १५ वर्षापासून स्वबळ व स्वकर्तुत्वावर अखंडीतपणे सदस्यत्व टिकवून ठेवून असलेले भाजपच्या एकमेव नगरसेविका दिपाली लाड यांचे पती ज्ञानेश्वर (नाना) लाड यांनी नुकताच भाजपाला जय श्रीराम ठोकून खा.हेमंत पाटील यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. माहूर न.प.ची सार्वत्रिक निवडणूक आल्याने माहूर शहर व तालुक्यात विविध पक्षातील असंतुष्ट पक्षांतर करण्याच्या तयारीत असून सध्या माहूर तालुक्यात हा ज्वर वाढला आहे.


माहूर शहरात गेल्या १५ वर्षापासून हमखास विजयी होण्याची खात्री असलेला परिवार म्हणून ओळख असलेल्या भाजपच्या एकमेव विद्यमान नगरसेविका सौ.दिपाली लाड यांचे पती ज्ञानेश्वर(नाना) लाड यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजपा ला शिवसेनेकडून हा जब्बर धक्का मानला जात आहे. याच वेळी ज्ञानसागर बहुउद्देशीय संस्थाच्या प्रमुख सुजाता कांबळे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.


सन २०१७ मध्ये झालेल्या माहूर न.प.च्या निवडणुकीत राज्यात भाजपाची सत्ता असताना किनवट नगरपरिषदेची निवडणूक लढवून यशस्वी होणाऱ्या भाजप नेते डॉ.अशोक पाटील सूर्यवंशी यांच्या राजकीय कौशल्य व धनाचा माहूर न.प. निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात वापर झाला तरी सुद्धा आपल्या वार्डात नातेसंबध व मितभाषी सर्वांशी आपुलकीने वागणारे ज्ञानेश्वर(नाना) लाड यांच्या पत्नी सौ.दिपाली नाना लाड यांच्या एकमेव विजया व्यतिरिक्त भाजपाला एकही सदस्य निवडून आणता आला नाही. किंबहुना दुसऱ्या क्रमांकावर सुद्धा आणता आला नाही. दरम्यान न.प.च्या अडीच वर्षाच्या पहिल्या टर्म नंतर भाजपच्या एकमेव नगरसेविका सौ.दिपाली लाड यांना नगराध्य्क्ष करण्यासाठी भाजपाने साम दाम दंड भेद नीतीचा अवलंब करून एमआयएमच्या एकमेव नगरसेविका सुद्धा आपल्याकडे वळवून जुळवाजुळव केली. परंतु नैतिकता राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेसच्या बाजूने असल्याने अखेरच्या क्षणी ईश्वरचिठ्ठीने राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या बाजूने कौल दिल्याने अनुक्रमे नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल जाधव या तर उपनगराध्यक्षा काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांच्या सुविद्य पत्नी सौ.अश्विनीताई तुपदाळे पाटील या झाल्या.सदर घडामोडीत पक्षातील काही स्थानिक नेत्यांचा लाड यांना नगराध्यक्ष करण्याबाबत विरोध असल्याने पक्षाचे प्रयत्न अयशस्वी झाल्याने ते स्थानिक नेते खूपच आनंदित झाल्याची बाब ज्ञानेश्वर लाड यांना त्यावेळी खटकल्याने तेव्हापासूनच ते भाजपा पासून अलिप्त राहून शिवसेनेच्या संपर्कात होते.अखेर दि.२७ रोजी गिरगाव ता. वसमत येथे खा.हेमंत पाटील, कळमनुरीचे आ.संतोष बांगर, जिल्हा प्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उपजिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, माहूर तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक, माहूर शहरप्रमुख निरधारी जाधव यांच्या उपस्थितीत गिरगाव ता.वसमत येथे झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत शिवबंधन हाती बांधले. यावेळी सुजाता कांबळे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख विकास कपाटे, न.प.गटनेते नगरसेवक दीपक कांबळे, विजय कामटकर, रवी मार्गंमवार आदी शिवसैनिक उपस्थित होते. ज्ञानेश्वर (नाना) लाड यांच्या पक्षांतराने माहूर शहरातील वार्ड क्र.११ च्या राजकीय समीकरणावर दूरगामी परिणाम होणार आहेत. जसजशी निवडणूक जवळ येईल तस तसा हा पक्षांतराचा ज्वर वाढण्याची शक्यता असून विविध पक्षाचे अनेक कार्यकर्ते कोलांटउड्या घेण्याची शक्यता आहे.किनवट -माहूर विधानसभा मतदार संघात १५ वर्षे निर्विवाद वर्चस्व राखून असलेल्या माजी आ. प्रदीप नाईक यांचा पराभव करून आ. भीमराव केराम हे भाजपाचे आमदार झाल्यानंतर माहूर शहरात भाजपचे बळ वाढल्याचे मानल्या जात असतांना पक्षात इनकमिंग ऐवजी आउट गोइंग होतांना दिसत असल्याने आगामी माहूर न.प.निवडणुकीत भाजपाची काय रणनीती असेल भाजप आमदार असण्याचा माहूर न.प.च्या निवडणुकीत भाजपला कितपत फायदा होईल हे बघणे औत्सुक्याचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.