मा.खा.किरीट सोमैया उद्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर.

614
नांदेड –
भारतीय जनता पार्टीचे नेते तथा मा.खा.किरीट सोमैया हे उद्या दि. ८ डिसेंबर रोजी नांदेड जिल्हा दौ-यावर येत आहेत. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे बुलढाणा अर्बन बँकेत ते भेट देणार असून पार्टीचे उपाध्यक्ष रवींद्र पोतगंटीवार यांच्याकडे सदिच्छा भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी १२.३० वा. आमदार राजेश पवार यांच्या कार्यालयाचे उद्घाटन धर्माबाद येथेच करणार आहेत व मग नांदेडकडे प्रस्थान करतील. दुपारी ३ वा नांदेड महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत यांच्या दालनात भेट देऊन चर्चा करणार आहेत. सायंकाळी ४ वाजता खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन धीरज स्वामी यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
सायंकाळी ५ वा. खासदार यांच्या कार्यालयात ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. ६ वा. नांदेड मधील काही ठिकाणी ते प्रत्यक्ष भेट देणार आहेत.रात्री ८ वा. भाजपा महानगर जिल्हा अध्यक्ष प्रवीण साले यांच्या निवासस्थानी भेट देणार असून, उद्या दिवसभरात ज्यांना किरीट सोमैया यांना काही संघटनांना व्यक्तिगत भेट द्यायची असेल तर भाजपाचे महानगर अध्यक्ष प्रवीण साले यांच्याशी संपर्क करावा, असेही प्रविण साले यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.