मी आज जे काही, सर्वस्व ना.अशोकराव चव्हाणांमुळे- आ.अमरनाथ राजूरकर.
नवीन नांदेड-
मी आज जे काही, सर्वस्व ना.अशोकराव चव्हाण यांच्यामुळे असल्याचे प्रतिपादन आ.अमरनाथ राजूरकर यांनी सिडको येथील आयोजित नागरी सत्कार सोहळा प्रसंगी व्यक्त करून पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वेळोवेळी सहकार्य केल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे सांगितले.
सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आ.अमरनाथ राजूरकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल भव्यदिव्य नागरी सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन सिडकोच्या कामगार कल्याण केंद्र, शिवाजी चौक येथे ३१ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. यावेळी माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत, आ.मोहनअण्णा हंबर्डे, प्रदेश सचिव अँड.सुरेद्र घोडजकर पक्ष प्रवक्ते संतोष पांडागळे, जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे, नगरसेवक संदीप सोनकांबळे, राजू काळे,श्रीनिवास जाधव, मंगला जाधव,दिपाली मोरे, माजी नगरसेवक संजय इंगेवाड, संजय मोरे,सिध्दार्थ गायकवाड,माजी नगरसेवक डॉ.करूणा जमदाडे,प्रा.ललीता शिंदे,ऊदय देशमुख, डॉ.अशोक कंलत्री, डॉ.नरेश रायेवार, दलितमित्र नारायण कोलंबीकर,माधव अंबटवार, सतिश बसवदे,राजु लांडगे, बापुसाहेब पाटील, प्रमोद टेहरे, निवृत्ती कांबळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्यदिव्य सोहळा पार पडला.
यावेळी आ.राजूरकर यांनी मनपाच्या प्रत्येक वॉर्डासाठी प्रत्येकी दोन कोटी रुपये दिले असून सहा महिन्यांचा काळात प्रत्येक प्रभाग हा विकासात्मक दिसेल.रस्ते,पाणीपुरवठा व मुलभूत सुविधा साठी ही निधी उपलब्ध झाल्याचे सांगितले, पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यासाठी चारशे कोटी रुपये विकासासाठी आणल्याचे सांगून , समृध्दी महामार्गासह सिडको हस्तांतरित प्रश्न लवकरच सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांनी सर्वांच्या आशीर्वादाने आमदार झाल्याचे सांगून पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्ये हात बळकट करण्यासाठी खंबीरपणे पाठीमागे राहून काँग्रेस पक्षाला साथ द्यावी असे आवाहन केले.