मुंबईत भारतीय नौदलाची युध्दनौका आयएनएस रणवीरवर स्फोट, तीन जवान शहीद तर अनेक जखमी

760
मुंबई –
भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस रणवीरवर मुंबईत स्फोट झाला. या अपघातात नौदलाच्या तीन जवानांचा मृत्यू झाला असून यामद्धे अनेक जण जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेबाबत भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे एक दुर्दैवी घटना घडली. आयएनएस रणवीरच्या अंतर्गत डब्यात घडलेल्या स्फोटात नौदलाच्या ३ जवानांना प्राण गमवावे लागले. जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली.
नोव्हेंबर २०२१ पासून आयएनएस रणवीर पूर्व नौदल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनात होती, व लवकरच बेस पोर्टवर परत येणार होती. अपघातानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश बोर्ड ऑफ इन्क्वायरीला देण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,११ जवानांवर स्थानिक नेव्ही हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.