मुक्तीसंग्राम दिनानिमित्त नायगाव तालुक्यातील 11 गावात कोविड लसीकरण मोहीम. -तहसीलदार गजानन शिंदे

379

नायगाव, नांदेड –
नायगाव तालुक्यातील 11 गावात कोरोना लसीकरण मोहिमेचे मराठवाडा मुक्तिदिनाच्या औचित्याने आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नायगाव तालुक्याचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी दिली आहे.

कोरोना महामारीमुळे संबंध जग मोठया संकटात सापडले आहे. यातून तालुक्यातील जनतेची आरोग्यविषयक सुटका व्हावी यासाठी नायगाव तालुक्यातील कोलंबी, धानोरा त.मा., मुगाव, धुप्पा, घुंगराळा, देगाव, हुस्सा, बेटकबिलोली, वजीरगाव, पाटोदा,अंतरगाव,इज्जतगाव आदी गावात मराठवाडा मुक्तिदिनाच्या निमित्ताने कोरोना लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून या लसीकरण मोहिमेत नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपण व आपले कुटुंबीय कोरोना महामारीपासून सुरक्षित करून घेण्याचे आवाहन तहसील तहसील प्रशासनाच्या वतीने नायगाव तालुक्याचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.