मुखेडच्या भगनूर येथे वाल्मिक जयंती उत्साहात साजरी व सभामंडपाचा लोकार्पण सोहळा संपन्न.

294
दादाराव आगलावे,
मुखेड, नांदेड –

मुखेड येथून जवळच असलेल्या भगनूर येथे वाल्मिकी जयंती संपन्न झाली. तसेच आमदार डॉ.तुषार राठोड यांच्या हस्ते यांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या महर्षी वाल्मिकी सभामंडपाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडवोकेट खुशालराव पाटील उमरीकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून बाजार समितीचे माजी सभापती ॲडवोकेट बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, पंचायत समिती सभापती प्रतिनिधी लक्ष्मण पाटील खैरकेकर, सरपंच बालाजी बोइनवाड, उपसरपंच संतोष पाटील, सामाजिक कार्यकर्ता अशोक बोईनवाड, पत्रकार गुरुनाथ पेंढारकर, ग्रामसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष ॲड.सुभाष पाटील इंगळे यांनी केले.यावेळी बोलताना ते म्हणाले की, आमदार डॉ.तुषार राठोड यांनी भगनूर सारख्या एका खेडेगावांमध्ये सभामंडपासाठी निधी देऊन भव्य मंडप ग्रामवासियांसाठी खुले करुन दिले आहे ही भुषणावह गोष्ट आहे. महर्षी वाल्मिकीच्या जीवनचरित्रातून सर्वांनी आपल्या जीवनात चांगला बदल घडवून आणावा, जीवनात परिवर्तन घडवून आणावे,भगवंताच्या नामाचे स्मरण करावे नाम संकीर्ण किर्तन करावे व आपला उद्धार करून घ्यावा असेही ॲड.सुभाषराव भगनूरकर म्हणाले. आमदार डॉ. तुषार राठोड म्हणाले की, महर्षी वाल्मिकीचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. वाल्याचा वाल्मिकी झाला तसेच सर्वांनी आपल्यातील अवगुन टाकून द्यावे व सद्विचार सदविवेक बाळगावा हीच अपेक्षा मी ग्रामवासियांकडून करतो व हा सभामंडप सर्वांसाठी खुला करून देतो असे आमदार राठोड म्हणाले.

कार्यक्रमास रामदास चिकटवाड, देविदास झिंकवाड, माजी उपसरपंच संतोष झिंकवाड, सामाजिक कार्यकर्ता अशोक बोईनवाड, जयसिंग मेथेवाड, धोंडीबा झिंकवाड, परमेश्वर फिरंगवाड, धोंडीबा मेथेवाड, आत्माराम बोईनवाड, माधव मेथेवाड, उत्तम बोईनवाड, हनमंत चिकटवाड, मष्णाजी राहूलवाड, गोविंद पिलेवाड, हणमंत बोईनवाड, परसराम झिंकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.